एक्स्प्लोर
IND vs WI 2nd T20 | विराटचा सीमारेषेवर अफलातून झेल पाहून सगळेच थक्क!
वेस्ट इंडिजने तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनेशनल क्रिकेट स्टेडिमयममध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतावर आठ विकेट्सनी मात केली.
तिरुअनंतपुरम : तिरुअनंतपुरममध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा टी सामना टीम इंडियाने गमावला असला तरी, या सामन्यात विराट कोहलीने पकडलेल्या झेलने क्रिकेटरसिकांची मनं जिंकली. सामन्याच्या चौदाव्या षटकात रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर विंडीजच्या हेटमायरचा लॉन्ग ऑनच्या दिशेला विराटने अफलातून झेल पकडला. विराटने उजव्या बाजूला धावत जाऊन सीमारेषेवर टिपलेला हा अशक्यप्राय झेल डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला. त्याच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
वेस्ट इंडिजने तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनेशनल क्रिकेट स्टेडिमयममध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतावर आठ विकेट्सनी मात केली. भारताने शिवम दुबेच्या (54 धावा) अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेट्सच्या मोबदल्यात 170 धावा केल्या होता. त्यानंतर 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीजचे सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. 73 धावांवर पाहुण्या वेस्ट इंडिजने पहिली विकेट गमावली. सिमन्सन च्या नाबाद 67 धावांच्या शानदार खेळीमुळे, दोन विकेट्स गमावून 18.3 षटकातच सामना जिंकला.
शिमरोन हेटमायरला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. रवींद्र जाडेजाच्या चेंडूवर लॉन्ग ऑनच्या दिशेने धावत विराटने जबरदस्त झेल पकडला. झेल टिपल्यानंतर तो मैदानावर पडला मात्र चेंडू हातातून सोडला नाही. या झेल पाहून स्टेडियममधील सगळेच थक्क झाले.
सामन्यानंतर या झेलबद्दल विचारला असताना विराट म्हणाला की, "हे काही अशाप्रकारचे झेल असतात, जेव्हा चेंडू हातात अडकतो. मी चेंडू पाहत होतो. मग दोन्ही हात पुढे केले आणि सुदैवाने चेंडू हातात आला." पुढे तो म्हणाला की, "मागील सामन्यात मी एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण पकडू शकलो नाही. तुम्ही प्रयत्न करता पण अनेक वेळा यश येत नाही." विराट कोहलीने या सामन्याच 17 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 19 धावाच केल्या. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील तिसरा आणि निर्णायक टी20 सामना 11 डिसेंबर रोजी मुंबईत खेळवण्यात येईल..@imVkohli on THAT screamer???? #IndvWI pic.twitter.com/5uZovbhzMt
— BCCI (@BCCI) December 8, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement