एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND VS WI 1st T20 - भारताचा दणदणीत विजय, विराटच्या नाबाद 94 धावा
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने सहा विकेट्सनी दमदार विजय साजरा केला.
हैदराबाद : कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने हैदराबादच्या पहिल्या टी-20 सामन्यात सहा विकेट्सनी दमदार विजय साजरा केला. या विजयासह टीम इंडियाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात विंडीजने टीम इंडियासमोर 208 धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. पण विराट आणि राहुलच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान 8 चेंडू आणि सहा विकेट्स राखून पार केलं. विराटने 50 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी केली. तर राहुलने 40 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 62 धावा फटकावल्या.
तत्पूर्वी शिमरॉन हेटमायर आणि एविन लुईसच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 20 षटकांत पाच बाद 207 धावांचा डोंगर उभारला होता. हेटमायरनं ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतले पहिले अर्धशतक झळकावताना 56 धावा कुटल्य़ा. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. सलामीच्या लुईसनेही अवघ्या 17 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 40 धावा फटकावल्या. तर कर्णधार कायरन पोलार्डने 37 धावांचं योगदान दिलं. त्यानेदेखील चार षटकार ठोकले. भारताकडून यजुवेंद्र चहलने 36 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडले. तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला.
हैदराबादमध्ये टीम इंडियाकडून टी-20 सामन्यात सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग
हैदराबादमधल्या आजच्या सामन्यात टीम इंडियाने 208 धावांचा यशस्वी पाठलाग केला. टी-20 क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात भारताने केलेला हा सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग ठरला.
भारताकडून धावांचा यशस्वी पाठलाग
208 वि. विंडीज (2019)
207 वि. श्रीलंका (2009)
202 वि. ऑस्ट्रेलिया (2013)
199 वि. इंग्लंड (2016)
198 वि. ऑस्ट्रेलिया (2018)
दरम्यान, के. एल. राहुलने आज त्याच्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीतल्या एक हजार धावांचा टप्पा पार केला. हा पल्ला गाठणारा राहुल सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे.A captain's knock by @imVkohli as India win the 1st T20I by 6 wickets. #INDvWI #TeamIndia pic.twitter.com/osg63znNEn
— BCCI (@BCCI) December 6, 2019
MILESTONE ????
1000 T20I runs for @klrahul11 ???????? He is the 7th Indian batsman to achieve this feat. pic.twitter.com/8oCWlpfDYg — BCCI (@BCCI) December 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement