एक्स्प्लोर
Ind vs WI 2nd T20 | वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर आठ विकेट्सनी दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी
सलामीच्या लेंडल सिमन्सनं सलामीला येत 45 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी केली. त्यानं एविन लुईससह पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचून विंडीजच्या विजयाचा पाय रचला.
तिरुअनंतपुरम : लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिरुअनंतपुरमच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत टीम इंडियावर आठ विकेट्सनी दणदणीत विजय साजरा केला. या सामन्यात भारतानं विंडीजसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विंडीजनं हे आव्हान नऊ चेंडू आणि आठ विकेट्स राखून पार केलं.
सलामीच्या लेंडल सिमन्सनं सलामीला येत 45 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी केली. त्यानं एविन लुईससह पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचून विंडीजच्या विजयाचा पाय रचला. लुईसनं 40 धावांचं योगदान दिलं. या विजयासह विंडीजनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
त्याआधी मुंबईकर शिवम दुबेच्या दमदार अर्धशतकाच्या जोराव 20 षटकांत सात बाद 170 धावांची मजल मारली. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या दुबेनं मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत 30 चेंडूत तीन चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावांची खेळी उभारली. शिवम दुबेचं आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतलं हे पहिलं अर्धशतक ठरलं. तर रिषभ पंतने 22 चेंडूत नाबाद 33 धावा फटकावल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement