Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; माणगावात 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: मढीच्या जत्रेतला मुस्लिम समाजाकडून हिंदूनी खरेदी करू नये हा मुद्दा तापला असताना, त्याचीच री ओढत भाजपचा राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी किल्ले शिवनेरीवर वादग्रस्त विधान केलाय. या वक्तव्याचा व्हिडीओ आता समोर आलाय.
जागा विकताना कोणाला विकता,नारळ फुलवाले,गरब्यात डान्स करणारे,खोटा खोटा टिळा लावणारे या सगळ्यांची पाठीमागच्यांची रूप रेखा पाहून कोणाकडुन खरेदी करायचे हे ठरवा.तरच आपण वाचणार आहोत.हिंदु राष्ट्र बनवण्याची शेवटची आणि उत्तम संधी आहे. पण हे एकटे मोदी नाही बनवणार.अस म्हणत छत्रपती शिवरायांना मावळ्यांनी जशी साथ दिली तशी साथ द्यायला हवी..असं मेधा कुलकर्णी यांनी शिवनेरी वर म्हटलं आहे.तिथीनुसारच्या शिवजयंतीला त्या उपस्थिती होत्या.
महिला दिनी धक्कादायक घटना; वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर
वसई पूर्व परिसरात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच नवजात बालिका रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी सुमारे ७.५० वाजता वसंतनगरी सिग्नल परिसरात हिरव्या रंगाच्या वॉशिंग पावडरच्या पिशवीत ही बालिका आढळून आली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस 112 आपत्कालीन वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. बालिकेला तातडीने वसईतील सर डी. एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करत असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; माणगावात 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त
होळीचा सण साजरा करून मुंबईकडे परतणारे कोकणवासीय आणि पर्यटक यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर माणगाव बाजारपेठ ते गारळ फाटा दरम्यान सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.






















