वेंकटेश अय्यरच्या रुपात Team India ला मिळाला नवा फिनीशर, हार्दिक पंड्याला घेऊन मीम्स व्हायरल
टीम इंडियाने वेस्टइंडीजला एकदिवसीय आणि नंतर टी20 अशा दोन्हीमध्ये व्हाईट वॉश दिला. यावेळी वेंकटेश अय्यरने विशेष कामगिरी केली.
Indian Cricket Team : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात नुकतीच टी20 मालिका पार पडली. यावेळी भारताने विंडीजवर 3-0 ने विजय मिळवला. दरम्यान या मालिकेत सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. पण युवा खेळाडू वेंकटेश अय्यरच्या लक्षवेधी कामगिरीमुळे भारतीय संघाला एक नवा फिनीशर मिळाला आहे. अय्यरने तीन टी20 सामन्यांत 92 धावा केल्या. त्याने एका सामन्यात धडाकेबाज अशा नाबाद 35 धावाही ठोकल्या. दरम्यान अय्यरच्या या कामगिरीमुळे हार्दीकचं संघातील स्थान धोक्यात आलं असून त्याच्याबद्दलचे मीम्म सोशल मीडयावर व्हायरल होत आहेत.
वेस्टइंडीजविरुद्ध कोलकाता येथे पार पडलेल्या टी20 मालिकेतील शेवटच्या टी20 सामन्यात भारताने 17 धावांनी विजय मिळवला. यात अय्यरने 19 चेंडूमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद 35 धावा केल्या. यावेळी 4 चौकार आणि 2 षटकारही त्याने ठोकले. अय्यरच्या या खेळीमुळे पंड्याबद्दलचे मीम्म आता व्हयरल होत असून आहेत. यातील काही मीम्मसवर नजर फिरवूया...
गोलंदाजीसाठी हार्दीक तयार?
हार्दिक पांड्या याआधी 2021 साली झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघातून मैदानात उतरला होता. तेव्हापासून त्याच्या गोलंदाजीवर अनेक प्रश्न उठवले जात आहेत. दरम्यान त्याला गोलंदाजीवर काम करायचं असल्याने त्याने स्वत: निवडकर्त्यांना त्याला संघात घेऊ नये असं सांगितलं आहे. क्रिकेट वेबसाइट क्रिकबजच्या रिपोर्टमध्ये हार्दीक म्हणाला, "माझ्यासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी कायम एक आव्हान राहिलं आहे. मी कायम गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीने योगदान देत असतो. मी जेव्हा काही काळ केवळ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी काही काळ मैदानावर वेळ घालवून अधिक सराव करु इच्छित होतो. मला कायमच नवनवीन आव्हानांशी लढायला आवडतं. मला अंतिम रिझल्ट अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी यंदाही कसून सराव करणार आहे.'' हे असं बोलत हार्दिकने गोलंदाजी करणार असल्याचं जणू स्पष्ट केलं आहे.
हे देखील वाचा-
- IND vs SL, 1st T20: वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर आता भारत श्रीलंकेविरुद्ध सज्ज, कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना?
- Wriddhiman Saha : वृद्धीमान साहाला रवी शास्त्रींचा पाठिंबा, म्हणाले...
- ICC T20 Rankings : टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha