एक्स्प्लोर
Team India: रोहित शर्माचा पत्ता कट होणार; कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दोन नावाची चर्चा
Team India: रोहित शर्मानंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार याची चर्चा सध्या रंगली आहे.
Team India
1/6

न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसीतील शेवटची कसोटी मालिका खेळणार आहे. (Image Credit-BCCI)
2/6

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या चार ज्येष्ठ खेळाडूंपैकी किमान दोन खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका अंतिम ठरण्याची शक्यता आहे.(Image Credit-BCCI)
3/6

रोहित शर्मानंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार याची चर्चा सध्या रंगली आहे. (Image Credit-BCCI)
4/6

टीम इंडियाच्या कसोटी संघाचा जसप्रीत बुमराह सध्या उपकर्णधार आहे. परंतु बुमराह सर्वंच कसोटी मालिका खेळेल असं नाही. त्यामुळे बुमराहला कर्णधारपद देईल, अशी शक्यता दिसत नाही. (Image Credit-BCCI)
5/6

रोहित शर्मानंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी ऋषभ पंत आणि शुभमन गिलच्या नावाची चर्चा सुरु आहे. (Image Credit-BCCI)
6/6

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीआय याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Image Credit-BCCI)
Published at : 05 Nov 2024 07:37 AM (IST)
आणखी पाहा






















