नव्या टीम इंडियाची अचनाक घोषणा; रॉबिन उथप्पा कर्णधार, पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार!
Team India Hong Kong Cricket Sixes: क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला टीम इंडियाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाला कर्णधार बनवण्यात आले.
Team India Hong Kong Cricket Sixes: सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. याचदरम्यान, अचानक नवीन टीम इंडियाची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला टीम इंडियाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाला कर्णधार बनवण्यात आले.
हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धा 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रॉबिन उथप्पाकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली होती. टीम इंडियाने शेवटचे हाँगकाँग सिक्सचे विजेतेपद 2005 मध्ये जिंकले होते. यावेळी टीम इंडियासाठी जेतेपद पटकावण्याची जबाबदारी रॉबिन उथप्पावर असेल. या स्पर्धेसाठी 7 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
स्पर्धा कधी सुरू होणार?
हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धेचा सामना 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर स्पर्धेचा अंतिम सामना 3 नोव्हेंबरला खेळवला जाईल. रॉबिन उथप्पाच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 1 नोव्हेंबरला पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे.
हाँगकाँग सिक्सेससाठी भारतीय संघ-
रॉबिन उथप्पा (कर्णधार), केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली, श्रीवत्स गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी.

🚨 TEAM INDIA FOR HONG KONG SIXES TOURNAMENT. 🚨

Robin Uthappa (C), Jadhav, Manoj Tiwary, Nadeem, Goswami, Stuart Binny and Bharat Chipli. pic.twitter.com/xGp0dAHtIF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024

सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी खेळली ही स्पर्धा-
सचिन तेंडुलकरसारख्या अनेक दिग्गजांनी हाँगकाँगच्या सिक्सेस स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे हे उल्लेखनीय. याशिवाय एमएस धोनी, शेन वॉर्न, वसीम अक्रम, शोएब मलिक, सनथ जयसूर्या, अनिल कुंबळे, उमर अकमल, ग्लेन मॅक्सवेल आणि डॅमियन मार्टिन या खेळाडूंनीही या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. यावेळी टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तुम्ही सामना कुठे पाहू शकता?
हाँगकाँग सिक्सेसचे सामना स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल.
सहा खेळाडूंचा संघ आणि 10 षटकांचा सामना-
स्पर्धा रंजक होण्यासाठी त्याचे नियमही रंजक ठेवण्यात आले आहेत. एका सामन्यात फक्त 10 षटके असतात. एका संघाला 5 षटकांत फलंदाजीची संधी मिळते. त्याच वेळी, एका संघातील फक्त सहा खेळाडू मैदान घेऊ शकतात. यष्टिरक्षक वगळता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकावे लागते. पाच षटके संपण्यापूर्वी पाच खेळाडू बाद झाले, तर शेवटचा फलंदाज एकटाच फलंदाजी करेल.
संबंधित बातमी:
पाकिस्तानमध्ये नेमकं चाललंय काय?; आता अम्पायर संघ निवडणार, इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!