IND vs WI: भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर; कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी?
IND vs WI: वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय.
IND vs WI: वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. दरम्यान, केमर रोच, ब्रेंडन किंग आणि बोनरचं वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय संघात पुनारागमन झालंय. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयनं बुधवारी वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. यातच वेस्ट इंडीजनंही भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केलाय.
स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर आणि वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल यांना वेस्ट इंडिज वनडे संघात स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे, भारतीय खेळपट्ट्यांकडे पाहता वेस्ट इंडिजने 15 सदस्यीय संघात तीन फिरकी गोलंदाजांची निवड केलीय.
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ
वेस्ट इंडीज एकदिवसीय संघ: किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन, ब्राव्हो, शामराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाई होप (विकेटकीपर), अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमॅरियो शेफर्ड , ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श जूनियर
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल , कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
6 फ्रेबुवारी 2022- अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद
टी-20 मालिकेचं वेळापत्रक
15 फ्रेब्रुवारी 2022- कोलकाता
18 फेब्रुवारी 2022- कोलकाता
20 फेब्रुवारी 2022- कोलकाता
हे देखील वाचा-
- Charanjit Singh Death: भारतीय हॉकी संघाचे महान खेळाडू चरणजीत सिंह यांचं निधन
- IPL Auction : आयपीएलच्या लिलावात यंदा श्रीसंतवर लागणार बोली, ऑक्शनसाठी केलं रजिस्ट्रेशन
- IND vs WI: जाडेजाला संघात स्थान का नाही? बीसीसीआयनं सांगितलं कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha