Charanjit Singh Death: भारतीय हॉकी संघाचे महान खेळाडू चरणजीत सिंह यांचं निधन
Charanjit Singh Death: त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता उना येथील स्वर्गधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Charanjit Singh Death: भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचं आज (गुरुवारी) पहाटे 5 वाजता निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवलीय. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता उना येथील स्वर्गधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चरणजीत हे काही दिवसांपासून अस्वस्थ होते. चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 1994 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. चरणजीत यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीनंही गौरविण्यात आलंय.
चरणजीत सिंह उना जिल्हा मुख्यालयातील पीरनिगाह रोडवरील मैडी येथे राहत होते. त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1931 रोजी झाला. पंजाबमधील गुरुदासपूर आणि लायलपूर येथून त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षणादरम्यान चरणजीतने हॉकी खेळायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी लुधियाना येथून कृषी विषयात ग्रॅज्युएशन केले.
1950 मध्ये भारतीय हॉकी संघात स्थान मिळवलं
1949 मध्ये चरणजीत पंजाब विद्यापीठाच्या हॉकी संघात सामील झाला. त्याची कामगिरी पाहून त्याला विद्यापीठ संघाचा कर्णधार बनवण्यात आले. हळूहळू चरणजीतचे नाव राष्ट्रीय स्तरावर उदयास आले. 1950 मध्ये त्यांची भारतीय हॉकी संघात निवड झाली. 1951 मध्ये चरणजीत भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावरही गेला होता.
1963 मध्ये अर्जून पुरस्कारानं सन्मानित
रोम ऑलिम्पिकसाठी चरणजीतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी दुखापत झाल्यानं त्याला विजेतापदाचा सामना खेळता आला नाही. अंतिम फेरीत भारताचा पराभव करत पाकिस्ताननं सुवर्णपदक जिंकलं. 1961 मध्ये चरणजीत भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार बनला. 1962 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचाही तो भाग होता. यासाठी त्यांना 1963 मध्ये अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
1964 मध्ये पद्मश्री पुरस्कार
1964 मध्ये चरणजीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं अंतिम फेरी गाठली आणि 1960 च्या ऑलिम्पिकचा बदला पाकिस्तानकडून घेतला. विजेतेपदाच्या लढतीत भारताने पाकिस्तानचा 1-0 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर चरणजीत यांना 1964 मध्येच सरकारनं पद्मश्री देऊन सन्मानित केलं.
हे देखील वाचा-
- Krunal Pandya: भारताचा ऑलराऊंडर कृणाल पांड्याचं ट्विटर अकाऊंट हॅक
- Dwayne Bravo Dance On Srivalli Song: ब्राव्होचं अनोखं सेलिब्रेशन! विकेट घेतल्यानंतर मैदानातच केली 'श्रीवल्ली' गाण्यावरील सिग्नेचर स्टेप्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha