एक्स्प्लोर
जागतिक क्रमवारीत भारतीय कुस्तीपटू पहिल्या क्रमांकावर
भारतीय कुस्तीला पुन्हा एकदा चांगले दिवस येऊ लागले आहेत. यंदाच्या एशियाड क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पदकांयी लयलूट केली. आता भारतीयांना कुस्तीमध्ये आता अजून एक खूशखबर मिळाली आहे.
मुंंबई : भारतीय कुस्तीला पुन्हा एकदा चांगले दिवस येऊ लागले आहेत. यंदाच्या एशियाड क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पदकांयी लयलूट केली. भारतीयांना कुस्तीमध्ये आता अजून एक खूशखबर मिळाली आहे. कुस्तीच्या 65 किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने पहिला क्रमांक पटकावला आहे. बजरंगने यंदा एशियाड गेम आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली आहेत. यंदाचे वर्ष बजरंगसाठी चांगले गेले आहे. या वर्षात त्याने जागतिक स्तरावर तब्बल पाच पदके जिंकली आहेत. बजरंगने युनायटेड वर्ल्ड रेस्टलींगच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) यादीत 96 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे या यादीत बजरंगच्या आसपासदेखील कोणी नाही. क्युबाचा अॅलेजँद्रो एनरिक व्लाडेस टोबियर हा 66 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बजरंग आणि एलजँद्रोमध्ये 30 गुणांचे अंतर आहे. रशियाचा अखमद चाकेइव्ह 62 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना बजरंग म्हणाला की, ‘‘प्रत्येक खेळाडूला वाटते की त्याने जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हावे. मला हे स्थान मिळाले आहे, याचा आनंद आहेच, परंतु वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावून हे सर्वोत्तम स्थान मिळाले असते तर मला याहूनही जास्त आनंद झाला असता. मी खूप जास्त मेहनत घेत आहे आणि माझे हे अव्वल स्थान मी पुढील वर्षीही टिकवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.’’
आणखी वाचा























