एक्स्प्लोर

दिल्लीच्या प्रदूषणाला कंटाळला, आशिष नेहरा गोव्यात स्थायिक!

नेहराने काही दिवसांपूर्वी टेलीग्राफला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने दिल्लीबाहेर राहण्यासाठी घर शोधत असल्याचं म्हटलं होतं.

पणजी: दिल्लीच्या प्रदूषणाला कंटाळलेला टीम इंडियाचा माजी गोलंदाज आशिष नेहरा, आता गोवेकर झाला आहे. नेहराने पर्वरी परिसरात एक बंगला भाड्याने घेतला आहे. गोव्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांच्या शेजारीच हा बंगला आहे. आयपीएलमध्ये नेहरा रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाज प्रशिक्षक आहे. आयपीएलचा हंगाम जोमात असतानाही, नेहरा वेळात वेळ काढून टेनंट्स व्हेरीफिकेशन फॉर्म अर्थात भाडेकरु नोंदणी फॉर्म नेण्यासाठी नुकताच पर्वरी पोलिस स्टेशनमध्ये येऊन गेला. नेहराचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. नेहराने काही दिवसांपूर्वी टेलीग्राफला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने दिल्लीबाहेर राहण्यासाठी घर शोधत असल्याचं म्हटलं होतं. बॉलिवूड कलाकारांसह मोठमोठे व्यावसायिक, उद्योजकांना गोव्यात आपले सेकंड होम असावे, असे वाटत असते. त्यातूनच अनेकांनी इथे फ्लॅट आणि बंगले विकत घेतले आहेत. दिल्लीच्या प्रदूषणाला कंटाळला, आशिष नेहरा गोव्यात स्थायिक! भारतीय संघाचा फलंदाज युवराज सिंगने मोरजी येथे बंगला विकत घेतल्याची बातमी काही दिवसापूर्वी आली होती. आता आशिष नेहरा हा देखील गोव्यात स्थायिक होण्याची तयारी करीत आहे. तूर्त तो भाड्याच्या खोलीत राहणार आहे.  म्हणूनच भाडेकरू म्हणून आपली नोंदणी करण्यासाठी सोमवारी त्याने पर्वरी पोलिस स्थानकात हजेरी लावली होती. गेल्याच महिन्यात टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत आशिष नेहराने गोव्यात स्थायिक होण्याचा इरादा स्पष्ट केला होता. निवृत्तीनंतर आपल्याला कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे. त्यासाठी आपण योग्य जागेची निवड करीत आहे, असं नेहरा म्हणाला होता. दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळून तो मुंबईत स्थलांतरीत झाला. परंतु तिथे मन रमेनासे झाल्याने त्याने गोव्याची निवड केली. गोव्यात येऊन पहिल्यांदा त्याने इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. गोव्यातील वातावरणा त्याला भावले. इथली हिरवळ,समुद्र किनारे आणि विशेष म्हणजे प्रदूषण विरहीत वातावरण आवडल्याने, त्याने इथे राहण्याचा आपला बेत पक्का केला. त्याच्यासमोर सर्वात प्रथम आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी योग्य शाळा निवडण्याचे आव्हान होते. मुलांच्या शाळेचा प्रश्न सुटल्याने आपले मुख्य काम झालं, असं नेहरा म्हणाला. गोव्याचे हवामान, हिरवळ,प्रदूषणरहित वातावरण आणि समुद्र किनारे हे निवृत्तीनंतर जगण्याचे एक योग्य ठिकाण आहे, असे आपल्याला वाटले आणि म्हणूनच आपण इथे येण्याचे ठरविले,असं नेहरा म्हणाला. ‘मी एक साधा माणूस आहे. मला फक्त एक शॉर्ट्स, एक टी शर्ट, स्लीपर्स, सनग्लासेस आणि माझे कुटुंब सोबत हवे, असे म्हणणारा नेहरा आता गोव्यातील रस्त्यांवर मोकळ्या हवेत फिरताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget