(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Afghanistan Bomb Blast : अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट, मैदानात खळबळ
Afghanistan Bomb Blast Breaking : अफगानिस्तानच्या काबूल येथे अफगाणिस्तान क्रिकेट प्रिमीयर लीग सुरु असून याठिकाणी हा आत्मघातकी हल्ला झाल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे.
Afghanistan Bomb Blast Update: अफगाणिस्तानच्या (Afghanistan) काबूल येथे आयपीएल (IPL) प्रमाणे सुरु असणाऱ्या अफगाणिस्तानमधील The Shpageeza Cricket League या स्पर्धेदरम्यान मैदानातच बॉम्बस्फोट (Afghanistan Bomb Blast) झाल्याची घटना घडली आहे. हा एक आत्मघातकी हल्ला असून या हल्ल्यानंतर मैदानात मोठ्या प्रमाणात गडबड-गोंधळ उडाला होता. या बॉम्बब्लास्टनंतर सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे एका बंकरमध्ये नेण्यात आलं आहे. घटनेदरम्यान युनायटेड नेशन्सचा एक व्यक्ती मुलाखतीसाठी त्याठिकाणी गेला असल्याचंही समोर आलं आहे.
ही घटना बंद-ए-अमिर ड्रॅगन्स आणि पामिर झल्मी (Band-e-Amir Dragons and Pamir Zalmi) या संघामध्ये सामना सुरु असताना घडली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket Board) 2013 साली ही स्पर्धा सुरु केली होती. या स्पर्धेदरम्यान ही घटना घडली आहे. तालिबान राजवटीला विरोध करणाऱ्या इस्लामिक स्टेटने (IS) केलेल्या बॉम्ब हल्ल्यांच्या मालिकेचा फटका अफगाणिस्तानला बसला आहे. काबूल येथे दोन दिवसांपूर्वीच गुरुद्वारा कर्ते परवान येथे अशाचप्रकारे बॉम्बब्लास्ट झाला होता. मागील काही काळापासून अशाप्रकारे बॉम्बस्फोट अफगाणिस्तानमध्ये होतच असल्याचं दिसून येत आहे.
— Abdulhaq Omeri (@AbdulhaqOmeri) July 29, 2022
हे देखील वाचा -