IND vs WI, 1st T20 Live Streaming : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी20 मालिकेला सुरुवात, कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना?
India vs West indies T20 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आजपासून (29 जुलै) टी20 सामने खेळणार आहे.
India vs West Indies Live : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर आता पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. भारताने एकदिवसीय मालिका 3-0 च्या फरकाने एकहाती जिंकली. आता आजपासून टी20 सामन्यांना सुरुवात होणार आहे. आज पहिला सामना खेळवला जाणार आहे. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 29 जुलै रोजी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 8 वाजता सामना सुरु होईल. 7 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येणार आहे. फॅन कोड या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
वेस्ट इंडीजविरुद्ध T20 मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
हे देखील वाचा -
- IND vs WI, 3rd ODI, Match Highlights : शानदार! भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश
- ODI ranking : विराट कोहलीचं दृष्टचक्र संपेना, 7 वर्षांत सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारी, रोहितची रॅकिंगही घसरली
- BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार