एक्स्प्लोर

Actor Vikas Samudre On Sachin Pilgaonkar Trolling: 'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल

Actor Vikas Samudre On Sachin Pilgaonkar Trolling: बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीतलं मोठं नाव असूनही सचिन पिळगावकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. आता यावर अभिनेते विकास समुद्रे व्यक्त झाले आहेत. तसेच, त्यांना ट्रोल करणाऱ्यांना खरं खोटं सुनावलं आहे.

Actor Vikas Samudre On Sachin Pilgaonkar Trolling: मराठी मनोरंजनविश्वात (Marathi Industry) 'महागुरू' म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगावकर (Sachin Pilgounkar) त्यांच्या काही आठवणी मुलाखतींमध्ये सांगत असतात. अगदी बालवयातच त्यांनी सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, गायक, डान्सर म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर यांनी हिंदी, मराठीतील अनेक सिनेमांमध्ये मोलाची भूमिका साकारली. त्यांनी 'नदिया के पार', 'बालिका वधू', 'पारध', 'बचपन', 'ब्रह्मचारी', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकले. तर, 'अशीही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'आयत्या घरात घरोबा' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलंय. सध्या त्यांच्या अनुभवांचे किस्से सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. तर, त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या अनुभवांमुळेच अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीतलं मोठं नाव असूनही सचिन पिळगावकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. आता यावर अभिनेते विकास समुद्रे व्यक्त झाले आहेत. तसेच, त्यांना ट्रोल करणाऱ्यांना खरं खोटं सुनावलं आहे. नुकतीच राजश्री मराठीला त्यांनी मुलाखत दिली, त्या मुलाखतीत बोलताना ते बोलत होते. 

अभिनेते विकास समुद्रे काय म्हणाले? 

'नवरा माझा नवसाचा' सिनेमात आपल्या दमदार अभिनयानं अचूक कॉमिक टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता विकास समुद्रे यांनी सचिन पिळगावकरांना होणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं मत व्यक्त केलंय. विकास समुद्रे बोलताना म्हणाले की, "सचिन पिळगावकर यांना आता ट्रोल केलं जातं. हे आधीही घडलं असतं, जर तेव्हा सोशल मीडिया असतं. शोले चित्रपटादरम्यान, सचिन पिळगावकर यांनी कशी मदत केली, हे तुम्ही आता समाजमाध्यमांमवर ऐकता. हे आम्ही 22 वर्षांपूर्वीच ऐकलं. तीच गोष्ट जर खोटी असेल, तर माणूस कट टू कट 20 वर्षांनी कसं बोलेल?".

"सचिन पिळगावकर हे असे कलाकार आहेत ज्यांनी राज कपूर, गुरुदत्त यांसारख्या दमदार कलाकारांसोबत काम केलंय. लहानपणीच त्यांना अनेक अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे. गुरुदत्त यांच्यासोबत ते सिनेमा करणार होते. गुरुदत्त यांनी सांगितलं, सहा वर्षांच्या मुलाचं कॅरेक्टर आहे. पण तेव्हा सचिन पिळगावकर चार वर्षांचे होते. तेव्हा त्यांनी अगदी प्रांजळपणे विचारलं, आप नहीं लेंगे मुझे इस सिनेमा मैं? तेव्हा गुरुदत्त म्हणाले होते, नही मैं 2 साल वेट करुंगा असं म्हणाले होते. त्यांच्यासाठी हा सिनेमा थांबवला होता. दरम्यानच्या काळात गुरुदत्त यांचं निधन झालं होतं. मग त्यांच्या भावाने हा चित्रपट पूर्ण केला.सचिन पिळगावकर यांना घेऊनच त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला.त्यांना ट्रोल केलं जातं, याचं मला खरंच वाईट वाटतं", असं अभिनेते विकास समुद्रे बोलताना म्हणाले.

विकास समुद्रे म्हणाले की, "मी खात्रीनं सांगतो, पन्नाशीतला किंवा साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकर यांना ट्रोल करत नाहीये.ही जेन-झी पिढी त्यांना ट्रोल करत आहे.कारण त्यांनी अजूनही सचिन पिळगावकर यांना नीट ओळखलेलं नाही. त्यांचा ऑरा वेगळा आहे.हिंदीतील अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत सचिन यांचं उठणं बसणं असतं. तर, त्यांचा ऑरा असणारच ना... लहानपणापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलंय.त्यांना जेव्हा ट्रोल केलं जातं, तेव्हा खरंच वाईट वाटतं..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sudha Chandran On Govinda: गोविंदाचं करिअर कुणी बर्बाद केलं? प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, सगळंच स्पष्ट सांगून टाकलं

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget