याचा सर्वात जास्त उपयोग ऑनलाईन शॉपिंगसाठी होईल. कारण, याच्या माध्यमातून तुम्ही डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीला त्याचे सहज पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीचा यूनिक आयडी नंबर द्यावा लागेल. याशिवाय याच्या माध्यमातून तुम्ही फोन बिल, गॅस बिल, मोबाईल फोन रिचार्ज आदींचे पेमेंट करू शकता. यूपीआयचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचं यूपीआय सुसंगत मोबाईल अॅप गूगल प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करावं लागेल.
2/7
सध्या आंध्र बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनेरा बँक, कॅथलिक सीरियन बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय, टीजेएसबी, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कर्नाटक बँक, यूको बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, साऊथ इंडियन बँक, विजया बँक आणि यस बँकेचे अॅन्ड्रॉइड अॅपसोबतच यूपीआयची सुविधा उपलब्ध आहे.
3/7
सध्याचे बँकेचे व्यवहार कोअर बँकिंग सिस्टिम म्हणजेच एनईएफटी आणि आयएमपीएसनुसार होतात. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन बँकिंगवेळी बँक डिटेल सोबतच बँकेचा आयएफएससी कोड द्यावा लागत होता. पण यूपीआयमुळे ऑनलाईन बँकिंगमधील बरेच अडथळे कमी होणार आहेत.
4/7
यूपीआयमार्फत पैसे पाठवताना यूपीआय नंबर टाकल्यानंतर, जितकी रक्कम पाठवायची आहे, ती टाकावी लागेल. यानंतर बँकेकडून तुमच्या मोबाईलवर एमपिन नंबरचा एसएमएस येईल. हा एमपिन वन टाईम पासवर्डसारखा एका व्यवहारासाठी एकदाच वापरता येईल. नवीन व्यवहारासाठी नवीन एमपिन मिळेल. त्या व्यवहारासाठी आलेला एमपिन नंबर तुमच्या मोबाईल अॅपमध्ये टाकल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही एकाच दिवशी 50 हजारांपासून ते एक लाखांपर्यंतची रक्कम पाठवू शकता.
5/7
जर तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणीला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा तुम्हाला एखाद्याचे पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला त्याच्या अकाऊंट नंबरची गरज नाही. कारण आता आरबीआयने यूपीआय म्हणजे यूनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीला मंजूरी दिली असून ही नवी प्रणाली एनपीसीआय (National Payments Corporation of India)ने विकसीत केली आहे.
6/7
म्हणजे, जर तुमचं बँक खातं एसबीआयमध्ये असेल, आणि तुमचा नंबर 987654321 असेल, तर तुमच्या बँकेचा पत्ता 987654321HSBI असेल. तुमच्याच मोबाईल नंबरसोबत बँकेचे नाव जोडले गेल्याने, तुम्हाला लक्षात ठेवणेही सोपे होईल. अशाच प्रकारे तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचाही यूपीआय नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
7/7
यूपीआय मार्फत पैसे पाठवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर यूपीआय अॅप इन्स्टॉल करावं लागेल. उदाहरणार्थ एचडीएफसीचे पेजॅप, आयसीआयसीआय बँकेचे पॉकेट आदी बँकांचं यूपीआय सुसंगत अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावं लागेल. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरची नोंद केली जाईल. यावेळी तुम्हाला तुमचा आधार नंबर देणही गरजेचं असेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून यूनिक यूपीआय कोड पाठवला जाईल. हा नंबर म्हणजे तुमच्या बँकेचा पत्ता असेल.