एक्स्प्लोर
US China Tariff War : चीनचं डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर, 84 टक्के टॅरिफ लादत पलटवार, ट्रम्प आता काय करणार?
US China Tariff War : अमेरिकेनं चीनवर 104 टक्के टॅरिफ लादलं होतं. त्याला चीननं उत्तर देत पलटवार केला आहे. आता ट्रम्प काय करतात याकडे लक्ष लागलंय.
अमेरिका चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका
1/5

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 104 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. याला चीननं प्रत्युत्तर दिलं आहे. चीननं अमेरिकेवर 84 टक्के टॅरिफ लावलं आहे.
2/5

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धानं नवं वळण घेतलं आहे. चीनं अमेरिकेत तयार होणाऱ्या वस्तूंवर 84 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.
3/5

चीनच्या वित्त मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेवर लादण्यात आलेले टॅरिफ 10 एप्रिलपासून लागू होतील. यापूर्वी चीननं अमेरिकन उत्पादनांवर 34 टक्के टॅरिफ लावलं होतं.
4/5

अमेरिकेनं चीनवर लादलेलं टॅरिफ 104टक्के केल्यानंतर चीननं देखील त्यामध्ये 50 टक्क्यांची वाढ करुन 84 टक्के केलं आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालानं अमेरिकेच्या 12 संस्थांना निर्यात नियंत्रण यादीत टाकलं आहे. याशिवाय 6 अमेरिकन कंपन्यांना अविश्वसनीय संस्थांच्या यादीत टाकलं आहे.
5/5

अमेरिकेनं चीनवर 104 टक्के टॅरिफ लादल्यानंतर त्याचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारात दिसून आला. अमेरिकेनं लादलेले टॅरिफ 9 एप्रिलपासून लागू होणार आहेत. चीनं लादलेले टॅरिफ 10 एप्रिलपासून लागू होतील. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. दोन्ही देश जशास तस उत्तर देण्याचं धोरण स्वीकारत असल्याचं दिसतं.
Published at : 09 Apr 2025 06:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















