एक्स्प्लोर

हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा; शिंदे प्रकरणात अटकेपासून संरक्षण, पोलिसांना निर्देश

कुणाला कामरा यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबईत आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याचंही कामरा यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मुंबई : शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंनात्मक गाण्यातून टीक केल्यानंतर शिवसैनिक स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर चांगलेच संतापले होते. यावेळी, कुणाल कामराला (Kunal Kamra) दिसेल तिथं ठोकणार, मारहाण करणार अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. त्याच अनुंषगाने त्याला फोनही केला. मात्र, तो चेन्नईत होता. त्यामुळे, येथील खार पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरुद्ध शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यावरुन, जबाब नोंदविण्यासाठी कुणाल कामराच्या अटकेची मागणी होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने (High court) कुणाल कामराला मोठा दिलासा दिला आहे. पोलिसानी बजावलेल्या नोटीसचा संदर्भात 35(3) अंतर्गत कुणाल कामराला पहिली नोटीस पाठवण्यात आली होती. ज्याचा अर्थ होतो की, त्याच्या अटकेची गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायलायाने म्हटले आहे. त्यामुळे, कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण मिळालं असून आता तो जिथं आहे, तेथील पोलीस (Police) स्टेशनमध्ये आपला जबाब नोंदवू शकणार आहे. 

कुणाला कामरा यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबईत आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याचंही कामरा यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे, जर कुणाल कामरा मुंबईत आले तर त्यांच्या सुरक्षेची हमी, मुंबई पोलिसांनी घ्यावी. कामराच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याकरिता, योग्य काळजी घेणार का? असा सवाल न्यायालयाने सरकारी वकिलाना विचारला. त्यावर, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे, असे सरकारी वकिलांनी म्हटले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या द्विसदस्य खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. 

उच्च न्यायालयात आणि कुणाल कामराच्या प्रकरणात सुनावणी पार पडली. त्यावेळी, न्यायालयाने कामराच्या वकिलांना उद्देशून काही सूचना केल्या आहेत. आम्ही जर तुम्हाला तिथे जाऊन जबाब नोंदवण्याची परवागी देत आहोत मग काय हरकत आहे? असे न्यायालयाने म्हटले. तर, कुणाल कामरा मुंबईत कधी येतात असा सवालही उच्च न्यायालयाने विचारला.  तसेच, आम्ही तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने जबाब नोंदवण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सूचना करू शकतो. आपण जबाब नोंदवा, पण अटक करण्याची गरज नाही, हे तर पोलिसांनीही आपल्या समन्समध्ये म्हटलं आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यालयाने आज झालेल्या सुनावणी नोंदवले. त्यामुळे, कुणाला कामराला अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. 

जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही 

दरम्यान, कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी कामराच्या अटकेची गरज नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच, दाखल गुन्ह्यासंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी खार पोलिसांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. तुम्ही व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे जबाब घ्या किंवा चेन्नईला जाऊन जबाब नोंदवा. तेथील स्थानिक पोलिसांना आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास सांगतो, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. 

हेही वाचा

Flamingos परतीचा प्रवास... 5 महिन्यानंतर सोलापुरातून मायदेशी परतणार फ्लेमिंगो; निसर्गाची मनमोहक सुंदरता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar : बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास
बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget