लोकांच्या कामात हयगय खपवून घेणार नाही, कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने होणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं अधिकाऱ्यांना आदेश
लोकांच्या कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले.

Chandrashekhar Bawankule : लोकांच्या कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची ऑनलाइन बैठक घेतली. यामध्ये त्यांनी हे स्पष्ट आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयात जनतेला भेटीची वेळ ठरवा. वेळेचा फलक कार्यालयासमोर लावा असेही ते म्हणाले. राज्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ऑनलाइन बैठक
15 ऑगस्ट रोजी उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करणार
राज्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांची बावनकुळेंनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीला 525 अधिकारी उपस्थित होते. कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने होणार नाही असे बावनकुळे म्हणाले. गोपनीय अहवाल, जनतेशी संपर्क, लोकांची कामे, निकाली काढलेल्या सुनावण्याचे बदलीचे निर्णय याबाबत बावनकुळेंनी सूचना केल्या. सरकारचे प्राध्यान्य हे शेवटच्या माणसाला मदत करणे आहे. यामध्ये कोणीही हयगय केली तर कारवाई करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. 15 ऑगस्ट रोजी उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. विधिमंडळात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन प्रस्ताव ठेवू असेही ते म्हणाले.
वर्षभरात 1 हजार 600 शिबिरे घ्यायची आहेत
30 जून रोजी पांदण रस्त्यांचा कामाचा अहवाल प्रत्येक तहसीलदाराने महसूल मंत्रालयात द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियानात सहभाग घ्या. 1 हजार 600 शिबिरे वर्षभरात घ्यायची आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला महसूल खाते आणि मंत्री ऐकणार नाही. जे महसूल कायदे अडचणीचे ठरत आहेत, त्याबाबत महसूल मंत्र्यांकडे कळवा, चर्चा करुन बदलू असेही बावनकुळे म्हणाले. वाळू गरीब नागरिकाला मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात 20 लाख घरकुले होणार आहेत. त्यासाठी वाळू देताना कोणताही कामचुकारी खपवून घेणार नाही असही बावनकुळे यांनी सांगितलं.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या आजच्या या बैठकील सर्व अधिकारी तहसीलदार उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांना मंत्री बावनकुळे यांनी सूचना दिल्या आहेत. लोकांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय न करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. समाजीताल शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची आहे. त्या दृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी काम करावं असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाची बातम्या:
बावनकुळेंकडे पाहून गडकरी म्हणाले, मी ज्या ज्या चुका केला त्या तुम्ही केल्या, जातीचे सेल उघडून फायदा नाही























