सर्वच राष्ट्रांच्या नेत्यांचा व्यापारी करारासाठी संपर्क, माझ्या #@$& चा मुका घेताहेत, ट्रम्प यांची जीभ घसरली
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादल्यानंतर त्या देशातील नेत्यांची खिल्ली उडवली होती.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांननी जगातील विविध देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लादत खळबळ उडवून दिली आहे. या नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील नेत्यांची खिल्ली उडवली. ट्रम्प म्हणाले की जगभरातील देश अमेरिकेसोबत व्यापारी करार करण्यासाठी उत्सुक करत असून टॅरिफ जाहीर केल्यानंतर करार करण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार करत आहेत. नॅशनल रिपब्लिकन काँग्रेस कमिटीत ट्रम्प बोलत होते. ते म्हणाले काही देश आमच्याशी संपर्क करत असून माझ्यापुढं नाक घासत आहेत, असं म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले टॅरिफ लागू झाले आहेत.
'अमेरिकेसोबत व्यापारी करारासाठी देश उतावीळ'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की," हे देश करार करण्यासाठी उतावळे आहेत, ते म्हणतात कृपया सर आमच्यासोबत सामंजस्य करार करा, यासाठी काहीही करु सर, हे देश अमेरिकेसोबत करार करण्यासाठी माझ्या #@$& ला चाटायला किंवा किस करायला तयार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी अतिरिक्त शुल्क लादण्याबाबत वक्तव्य केलं आहे. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी म्हटलं की, आम्ही लवकरच औषधांवर मोठं शुल्क लादण्याबाबत घोषणा करणार आहोत. जे देश याबाबत ऐकतील त्यांनी चीनपासून दूर व्हावं, ज्यांच्या उत्पादनांची विक्री अमेरिकेत होते, असं ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ संदर्भात मी ज्या प्रकारे वाटाघाटी करत आहे त्या प्रकारे निर्णय काँग्रेसला घेता आले नसते, असं म्हटलं. टॅरिफ संदर्भात भूमिका स्पष्ट नसणाऱ्या आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर देखील ट्रम्प यांनी हल्लाबोल केला आहे. ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ आजपासून लागू झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कुत्सित आणि गलिच्छ शब्दात जगातल्या सर्वच राष्ट्रांच्या नेतृत्वाची टिंगल उडविली. ट्रम्प म्हणाले, "जगातील सर्वच राष्ट्रांचे नेते आमच्याशी व्यापारी करार करण्यासाठी संपर्क साधत आहेत अन् माझ्या ढुंगणाचा मुका घेताहेत.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2025
फ्रान्समध्ये…
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कुत्सित आणि गलिच्छ शब्दात जगातल्या सर्वच राष्ट्रांच्या नेतृत्वाची टिंगल उडविली. ट्रम्प म्हणाले, "जगातील सर्वच राष्ट्रांचे नेते आमच्याशी व्यापारी करार करण्यासाठी संपर्क साधत आहेत अन् माझ्या #@$& मुका घेताहेत.
फ्रान्समध्ये अनियंत्रीत राजेशाही आणि वाढती महागाई विरोधात सन 1789 मध्ये जनतेने उठाव केला. त्यावेळी फ्रान्सची राणी मेरी अँटोइनेट ही देखील भूक आणि महागाई विरोधात रस्त्यावर उतरलेल्या जनतेची टिंगल करायची. एकदा तिने, "पाव मिळत नसेल तर केक खा", असे वाक्य उच्चारले. त्यामुळे चिडलेल्या फ्रेंच जनतेने राज्यसत्तेला हादरा दिला अन् आणि 9 नोव्हेंबर 1799 रोजी राज्यसत्ता उलथवून टाकली; या क्रांतिकारक घटनेला फ्रेंच राज्यक्रांती म्हणतात, अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली.
























