एक्स्प्लोर
Flamingos परतीचा प्रवास... 5 महिन्यानंतर सोलापुरातून मायदेशी परतणार फ्लेमिंगो; निसर्गाची मनमोहक सुंदरता
Flamingos माणसांसाठी निसर्गाने भरभरुन दिलंय, म्हणून पर्यटनाच्या अनुषंगाने माणूस जगभ्रमंती करतो. निसर्ग सौंदर्य, आणि मानवनिर्मित ठिकाण, धार्मिक पर्यटन करतो.
Temp_3_(21)
1/8

माणसांसाठी निसर्गाने भरभरुन दिलंय, म्हणून पर्यटनाच्या अनुषंगाने माणूस जगभ्रमंती करतो. निसर्ग सौंदर्य, आणि मानवनिर्मित ठिकाण, धार्मिक पर्यटन करतो.
2/8

मानवाप्रमाणे प्राणी, पक्षांसाठीही निसर्गाने पर्यटनाची सोय केलीय असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला विदेशातून सातासमुद्रपार प्रवास करत फ्लेमिंगो भारतात, महाराष्ट्रात येतात.
3/8

पंछी, नदीया, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके... ह्या गाण्यातील बोल त्यांच्यासाठी लिहिले की काय असे वाटते.
4/8

कारण, हे फ्लेमिंगो पक्षी आफ्रिका, यूरोप, आशिया, इराण आणि पाकिस्तानच्या काही भागांसह विविध प्रदेशांमधून स्थलांतर करत ते इथं येतात.
5/8

उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये भीम नदीत साता समुद्रापार आलेल्या फ्लेमिंगो पक्षांकडे पाहून निसर्गाने बनवलेल्या सुंदर सृष्टीला पाहून आनंद होतो.
6/8

या फ्लेमिंगोची उंची साधारण 90 ते 150 सेमी (3 ते 5 फूट) एवढी असते. गुलाबी किंवा लालसर रंग, लांब पाय, जाड खाली वळलेली चोच, मोठे पंख आणि लहान शेपटी अतिशय सुंदर दिसते.
7/8

उजनी धरणाच्या पाण्यावर तरंगणारे हे फ्लेमिंगो पाहून जणू जादुई प्रवास करतात की काय, जादुई आनंद घेतात की काय असा भास होतो.
8/8

आता, हे फ्लेमिंगो परतीच्या प्रवासाला निघाले असून या पक्षांचे उड्डाण हे कमी अंतरावर साधारण 35 मैल प्रति तास वेगाने असते, ते एका तासात तब्बल 35 मैल प्रवास करतात
Published at : 16 Apr 2025 08:51 PM (IST)
आणखी पाहा






















