एक्स्प्लोर
UPI : गुड न्यूज, आरबीआयचा मोठा निर्णय, यूपीआयद्वारे P2M व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास ग्रीन सिग्नल
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यूपीआय व्यवहारांच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी एनपीसीआयला परवानगी दिली आहे. यामुळं यूपीआय व्यवहारांना प्राधान्य मिळेल.
यूपीआय पेमेंटची मर्यादा वाढवली
1/5

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला यूनिफाइड पेमेंटस इंटरफेसद्वारे पर्सन-टू-मर्चंट व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
2/5

आरबीआयच्या निर्णयामुळं यूपीआयद्वारे मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ग्राहकांना यूपीआयद्वारे पीटूएमद्वारे शेअर बाजार, विमा यासारख्या व्यवहारांची मर्यादा 2 लाख रुपये आहे.
3/5

कराचं पेमेंट, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, आयपीओच्या पेमेंटसाठी मर्यादा 5 लाख रुपये आहे.
4/5

संजय म्हलोत्रा यांनी एनपीसीआयला यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारांच्या मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. तर, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला यूपीआयद्वारे पेमेंट करण्याची मर्यादा एक लाख रुपये कायम आहे.
5/5

आरबीआयचा हा निर्णय व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकतो. दुकानदार आणि छोटे व्यापारी यांना मोठे व्यवहार यूपीआयद्वारे करता येतील. यामुळं डिजिटल पेमेंटची संख्या वाढेल. यामुळं रोख व्यवहारांची संख्या कमी होईल.
Published at : 09 Apr 2025 11:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























