Uddhav Thackeray Vs Amit Shah | शाहांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला, ठाकरेंनी सुनावलं
तसंच रायगडावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी, उपस्थितांना संबोधित करताना... शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप होतोय... त्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय..
मुंबई : रायगडवर बोलताना अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस त्यावर गप्प बसून होते असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सत्ता नसताना जे सोबती आहेत तेच निष्ठावान आहेत. बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी पुण्याई उभी केली. त्यामुळे मला सत्तेची गरज नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते नाशिकच्या शिवसेना निर्धार मेळ्याव्यात बोलत होते.
अमित शाहांनी आम्हाला सांगू नये
उद्धव ठाकरे म्हणाले की, "चार दिवसांपूर्वी अमित शाह रायगडवर आले आणि त्यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की, शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमीत ठेऊ नका. पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सूरत लुटली त्यावेळी त्याची बातमी ही लंडन गॅझेटमध्ये छापून आली होती. त्यामुळे अमित शाहांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये."
भाजपला शिवाजी महाराजांबद्दल एवढंच वाटत असेल तर त्यांनी शिवजयंतीला देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.





















