गोपाळगडाची खासगी मालकी संपली; समुद्री तटांचे रक्षण करणारा किल्ला तब्बल 6 दशकांनंतर सरकारच्या ताब्यात
सागरी व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या हेतूने बांधलेला हा किल्ला काळाच्या ओघात केवळ 300 रुपयांना विकला गेला,आणि खाजगी मालकीचा झाला होता. आता तब्बल सहा दशकांनंतर गोपाळगडाची खासगी मालगी संपली आहे.

Ratnagiri: जागतिक व्यापारी केंद्राचे महत्वाचे बंदर असलेल्या दाभोळ बंदराच्या लगत असलेला ऐतिहासिक गोपाळ गड किल्ला अखेर खासगी मालकीतून मुक्त होत शासनाच्या ताब्यात जाण्याचे मार्ग तब्बल सहा दशकांनंतर मोकळा होतोय. स्वराज्याच्या मूर्तिमंत पुरावा देणारा अभेद्य किल्ला आता मोकळा श्वास घेणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधल्या अंजनवेल येथे समुद्राच्या किनाऱ्यावर दिमाखात उभा असलेला गोपाळगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे...(Gopalgad Fort)
समुद्री मार्गावरून होणारे आक्रमण रोखण्या बरोबरच दाभोळ बंदरावरून होणाऱ्या सागरी व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या हेतूने बांधलेला हा किल्ला काळाच्या ओघात केवळ 300 रुपयांना विकला गेला,आणि खाजगी मालकीचा झाला. इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला खासगी मालकित गेल्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व नष्ट होण्याच्या मार्गावर असताना अंजनवेल येथील तरुण दीपक वैद्य याने किल्ल्याचे दस्तावेज काढून त्याचा खरा वारस कोण याचा शोध घेत एकहाती मोहीम सुरू केली. प्रचंड संघर्ष करत महसूल आणि पुरातत्व विभागात झालेला कागदांचा घोळ उजेडात आणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातला किल्ला जो खासगी मालकीचा झाला होता,त्याला पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा उभा केला. (Gpalgad Custody Government)
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातला किल्ला
खरंतर गावातील ऐतिहासिक वास्तूकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे ही बाब लक्षात आल्यावर स्थानिक दुर्गोरेमी दीपक वैद्य यांनी शासन दरबारी अनेक कागदोपत्री पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांची ही मोहीम तालुका तसेच जिल्हाभरात सर्वदूर पसरली,परिणामी या मोहिमेत नंतर अनेक शिव प्रेमी आणि तत्सम संस्था जोडल्या गेल्या. त्यापैकी एक असलेली शिवतेज फाउंडेशन संस्था देखील या कायदेशीर लढ्यात सक्रिय झाली. गुहागर तालुक्यात सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती शिवाय गोपाळगड किल्ल्यावर नियमातपणे शिवजयंती साजरी होऊ लागली.
किल्ल्याचे सर्व कायदेशीर मार्ग मोकळे
शासन दरबारी हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने दुर्गप्रेमींमधून कमालीची नाराजी पसरली असताना मुलाचे गुहागर मधील पंवार साखरी येथील असलेले मात्र मुंबईस्थित असणारे अक्षय पवार या तरुणाने देखील किल्ल्याच्या संदर्भातील दस्तावेज जमा करत दीपक वैद्य यांच्या सहकाऱ्याने न्यायालयीन लढा सुरूच ठेवला, अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळाल्यावर हा किल्ला अधिकृत रित्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आला. पण या निकालाच्या विरोधात अंजनवेल मधील मणियार हे उच्च न्यायालयात गेले,मात्र तिथेही निकाल त्यांच्या विरोधात गेल्यामुळे किल्ल्याच्या संदर्भातील सर्व कायदेशीर मार्ग मोकळे झाले. एकूणच सरकारी अनास्थेचा बळी ठरलेला गोपाळगड किल्ला खासगी मालकीतून सरकारच्या ताब्यात आल्यामुळे अंजनवेल मधील पर्यटनात भविष्य काळात आणखी भर पडून गोपाळगड किल्ला स्वराज्याची निशाणी डौलाने फडकडवेल यात शंका नाही.
हेही वाचा:
Gold Price : लाखांपासून फक्त दोनच हजार कमी... सोन्याच्या दराने 98 हजारांचा पल्ला गाठला
























