एक्स्प्लोर
रुक्मिणी मातेला महालक्ष्मीचे वैभवपूर्ण रूप, नवरात्रच्या सातव्या माळेला विठुरायाही सजला अनोख्या मौल्यवान अलंकारात
मंदिराच्या परिसरात पारंपरिक नवरात्र वातावरण अनुभवण्यासाठी भक्तांनी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत उत्साहात सहभाग घेतला.
Pandharpur
1/6

नवरात्र उत्सवाच्या सातव्या माळेत रुक्मिणी मातेला महालक्ष्मीच्या रूपात पारंपरिक आणि अत्यंत भव्य अलंकारात सजवण्यात आले आहे
2/6

यावेळी श्री विठुरायालाही मौल्यवान आणि प्राचीन अलंकारांनी सजवण्यात आले असून, भाविकांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.
3/6

आजच्या विशेष सोहळ्यात रुक्मिणी मातेला विविध पारंपरिक दागिन्यांनी नटवण्यात आले होते.
4/6

आजच्या विशेष सोहळ्यात रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, मस्य जोड, सूर्य-सोन्या-मोत्याचे तानवड, मोठी नथ, कर्णफुले, चिंचपेटी हिरवी, मन्यामोत्याच्या पाटल्या, जवेची दोन पदरी माल, कोल्हापुरी साज, दशावतारी हार, बाजूबंद, पेट्याची बिंदी, चंद्रहार, मण्यांची कंठी, अष्टपैलू मण्यांची कंठी, लक्ष्मीहार, पुतळ्यांची माळ, रूळ आणि पैंजण असे विविध प्रकारचे मौल्यवान अलंकार परिधान केले गेले
5/6

श्री विठ्ठलालाही या दिवशी अतिशय प्राचीन शैलीतील आणि मौल्यवान अलंकारात सजवण्यात आले आहे. विठ्ठल व रुक्मिणी मातेसाठी पारंपरिक अलंकारांची निवड ही भक्तांसाठी विशेष आकर्षणाचे ठरते.
6/6

या वर्षी नवरात्राच्या सातव्या माळेत रुक्मिणी माता महालक्ष्मीच्या रूपात सजल्यामुळे आणि विठुरायालाही भव्य अलंकारात पाहता, भक्तांचा उत्साह चरमसीमेवर पोहचला आहे.
Published at : 28 Sep 2025 07:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























