एक्स्प्लोर
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
Diwali धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पुरातन व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
Pandharpur chandrabhaga diwali
1/8

दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून काल वसुबारस नंतर आज धनत्रयोदशीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे.
2/8

एकीकडे घरोघरी दिव्यांची उजळण पाहायला मिळत आहे, दुसरीकडे उंचच उंच इमारतीवर विद्युत रोषणाई आकर्षक ठरत आहेत.
3/8

देशभरातील देवस्थान, मंदिर, नदीकिनारी देखील दिव्यांची उजळणी पाहायला मिळत असून तो क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेकजण गर्दी करत आहेत
4/8

पंढरी नगरी देखील दिवाळीच्या दिवे प्रकाशात उजळून निघाली आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी चंद्रभागा सुद्धा उजळून निघाली आहे.
5/8

चंद्रभागेच्या घाटांवर दीप उत्सवाच्या स्वरूपात सोनेरी रूप पाहायला मिळत आहे, चंद्रभागेच्या तिरी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीनिमित्त चंद्रभागेच्या तिरावर आज लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
6/8

धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पुरातन व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले आहेत.
7/8

श्री विठ्ठलास आज सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, शिरपेच मोठा १० लोलक असलेला, शिरपेच लहान, मस्त्य जोड, तोडे जोड, एकदाणी तुळशीची माळ ३ पदरी इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.
8/8

रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा, इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.
Published at : 18 Oct 2025 09:19 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























