एक्स्प्लोर
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
लक्ष्मीपूजनानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुल सजावट करण्यात आली आहे. सायंकाळी देवाच्या खजिन्यात लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे.
Pandharpur Photo
1/7

दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पंढरपुरमधील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
2/7

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बीड येथील भाविक अर्जुन हनुमान पिंगळे फुल सजावटीची सेवा अर्पण केली.
3/7

या सजावटीसाठी सुमारे दोन टन विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली आहेत. या फुलांमध्ये कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनीयम, जिप्स, सायकस, गुलछडी, इत्यादी फुलांचा समावेश आहे.
4/7

त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तीभावाने उजळून निघाला आहे.
5/7

मंदिरातील श्री.विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वार या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले आहे.
6/7

पारंपरिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभूती देत आहे.
7/7

या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा अत्यंत कुशलतेने केलेला वापर, रंगसंगतीतील समतोल, तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराच्या आध्यात्मिकतेला साजेसा सुगंधित वातावरणनिर्मिती झाली आहे.
Published at : 21 Oct 2025 04:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























