एक्स्प्लोर
Navratri 2022 : ए हालो! नागपुरात विविध मैदानांवर गरब्याची धूम...
नवरात्रात मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे. दोन वर्षांनंतर यंदा शहरात विविध ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. काही दुर्गा उत्सव मंडळ तर काहींनी मैदानांवर गरबा उत्सवाचे आयोजन केले.
दोन वर्षांनंतर आयोजित होत असलेल्या गरबा कार्यक्रमात नागपुरकर उत्साहात सहभागी होत आहेत.
1/11

नवरात्रात मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे. दोन वर्षांनंतर यंदा शहरात विविध ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक गुजराती गाण्यांबरोबर महाराष्ट्रीयन, रिमिक्स, बॉलिवूड गाण्यांवर गरब्याचा ताल धरण्यासाठी तरुणांबरोबर प्रौढही उत्सुक आहेत. काही दुर्गा उत्सव मंडळ तर काही आयोजकांनी विविध मैदानांवर गरबा उत्सवाचे आयोजन केले आहे.
2/11

रायसोनी ग्रुप तर्फे सीताबर्डी येथील अमृत भवन येथे आयोजित 'धमाल दांडिया' या गरबा कार्यक्रमात रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह निमंत्रितांना प्रवेश देण्यात येत आहे.
3/11

येथे फक्त सेलिब्रिटी उपस्थिती लावत नसून तर विद्यार्थ्यांसोबत गरबाचाही आनंद घेत आहेत.
4/11

रायसोनीच्या 'धमाल दांडिया'मध्ये दररोज एक सेलिब्रिटी गेस्टही बोलविण्यात येत आहे. यात शरद मल्होत्रा, गौरव बजाज, लिना जुमानी, आंचल खुराना, सोनी सिंग, क्षेरिश अली, गौरव खन्ना, अभिनव कपूर, दिलजीत कौर उपस्थिती लावणार आहे.
5/11

काही दुर्गा उत्सव मंडळ तर काही आयोजकांनी विविध मैदानांवर गरबा उत्सवाचे आयोजन केले आहे.
6/11

जेरी लॉनमध्ये 'यशिव रास गरबा 2022'चे आयोजन करण्यात आले आहे. याचे आयोजन मागील 5 वर्षांपासून निरंतर करण्यात येत आहे.
7/11

यशिव डान्स स्पेस तर्फे फक्त गरबाच नव्हे तर वर्षभर विविध डान्सच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.
8/11

राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे व्हॉलिबॉल मैदान, लक्ष्मीनगर येथे गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे मुंबई येथील प्रसिद्द बॅन्ड परफॉर्म करत असून येथे फक्त निमंत्रण असलेल्यांनाच गरबा करण्याची संधी दिली जात आहे.
9/11

नवरात्रीच्या पंधरा दिवसांआधीपासून येथे गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात येते. तसेच नवनवीन बॉलिवूडच्या गाण्यांवर स्टेप्स शिकवून शिकणाऱ्यांना 'गरबा रेडी' करण्यात येते. वर्कशॉपमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी यश तुमाने, तोषिता खोपडे, सिया जांगिड यांच्यासह संपूर्ण चमू सज्ज असते.
10/11

लक्ष्मीनगर येथील गरबा कार्यक्रमासाठी विशेष मुंबईवरुन प्रसिद्ध सेलिब्रिटी बॅन्ड बोलाविण्यात आला आहे.
11/11

दोन वर्षांनंतर आयोजित होत असलेल्या गरबा उपक्रमांना भेट देण्यासाठी तरुणांसह नागपूरकर कुटुंबासह भेट देत आहेत.
Published at : 28 Sep 2022 07:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र























