Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List: भाजप, शिवसेना, ठाकरे गटपासून दोन्ही राष्ट्रवादीपर्यंत...राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा संपूर्ण यादी...
Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List: राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 7 नावं आतपर्यंत निश्चित झाली आहेत. काल भाजपकडून 4 नावं जाहीर करण्यात आली.

Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List: निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2026) तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 7 जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू 6 आणि पश्चिम बंगाल आणि बिहार प्रत्येकी 5 आहेत. राज्यसभेसाठी आज म्हणजे 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 7 नावं आतपर्यंत निश्चित झाली आहेत. काल भाजपकडून रामदास आठवले (Ramdas Athawale),विनोद तावडे (Vinod Tawde),माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate),रामराव वडकुते (Ramrao Wadkute) ही नावं जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून (काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) शरद पवार यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले आहे.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी? (Maharashtra Candidate List For Rajya Sabha Election 2026)
भाजपचे उमेदवार- (Rajya Sabha Election 2026 BJP Maharashtra Candidate List)
- रामदास आठवले (Ramdas Athawale)
- विनोद तावडे (Vinod Tawde)
- माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate)
- रामराव वडकुते (Ramrao Wadkute)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-
- शरद पवार (Sharad Pawar)
काँग्रेस-
- शरद पवारांना पाठिंबा
शिवसेना ठाकरे गट-
- शरद पवारांना पाठिंबा
शिवसेना शिंदे गट-
- ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-
- पार्थ पवार (Parth Pawar)
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 रिक्त जागा, निवडून येण्याचं समीकरण काय? (Maharashtra Rajya Sabha Election 2026)
विधानसभेचे आमदार 286
- अजित पवार आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनाने 2 जागा रिक्त
- कोटा = एकूण आमदार (286) भागीले रिक्त जागा 7 + 1 याच्या उत्तरात + 1 मिळवायचे.
- म्हणजेच = 286 / 8 =35.75
- 35.75 + 1 = 36.75
- राज्यसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला 36.75 म्हणजेच 37 मते मिळायला हवीत.
कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)
- भाजपा- 132 - 1 = 131
- शिवसेना (शिंदे गट)- 57
- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40
- काँग्रेस- 16
- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
- शिवसेना (ठाकरे गट)- 20
- समाजवादी पार्टी- 2
- जनसुराज्य शक्ती- 2
- राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
- राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
- एमआयएम- 1 जागा
- सीपीआय (एम)- 1
- पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
- राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
- अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
- महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
- मविआ = 16+10+20+2+1 = 49
- इतर = 03
- एकूण = 286
कुणाचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (Mahavikas Aghadi vs Mahayuti)
- भाजपकडे 131 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 132 आमदार
- जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 132/37 = 3.56
- म्हणजे एकट्या भाजपचे 3 ते 4 खासदार निवडून येऊ शकतात.
शिवसेना शिंदे = 57 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 58 आमदार
- जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 58/37 = 1.56
- म्हणजे एकट्या शिंदेसेनेचा 1 खासदार निवडून येऊ शकतो.
- शिंदेंकडे 20 मते अतिरिक्त असतील.
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40
- जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 40/37 = 1.08
- म्हणजे एकट्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार निवडून येऊ शकतो.
- राष्ट्रवादीकडे 3 मते अतिरिक्त असतील.
मविआचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (How many MPs Elected From Mahavikas Ahadi)
- काँग्रेस- 16 +राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 + शिवसेना (ठाकरे गट)- 20 = 46
- मविआला पाठिंबा देणारे छोटे पक्ष = सपा 2 + माकप 1 = 3
- मविआकडे 46+3 = 49 आमदारांचं बळ
- जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 49/37 = 1.32
- म्हणजे मविआमध्ये सर्व पक्षांचा मिळून 1 खासदार निवडून येऊ शकतो.
- त्याउलट महायुतीमध्ये भाजपचे 3, शिंदेसेनेचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि अतिरिक्त मतांवरुन 1 असे 6 खासदार आरामात निवडून येतील.
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
- 5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
- 6 मार्च – अर्जांची छाननी
- 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
- 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेत रस्सीखेच, VIDEO:
संबंधित बातमी:






















