एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा उमेदवारीपूर्वी एकनाथ शिंदेंची निर्णायक बैठक; निवडणूक बिनविरोध की दुसरा उमेदवार देणार? घडामोडींना वेग

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आमदार, खासदार, मंत्र्यांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rajya Sabha Election 2026: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2026) पार्श्वभूमीवर आमदार, खासदार आणि मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ही बैठक बोलावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करायचा की दुसरा उमेदवारही रिंगणात उतरवायचा, यावर सखोल चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Rajya Sabha Election 2026 बिनविरोध निवडणुकीचा पर्याय चर्चेत

शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे समजते. मात्र, संख्याबळ आणि इतर पक्षांची भूमिका लक्षात घेता दुसरा उमेदवार देण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. बैठकीतील अंतिम निर्णयानंतरच पुढील रणनीती जाहीर केली जाणार आहे.

Rajya Sabha Election 2026: तुर्तास फक्त ज्योती वाघमारे यांचाच फॉर्म

दरम्यान, तातडीच्या घडामोडीत पक्षाकडून सोलापूरच्या प्रवक्त्या  ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांचाच उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या चेहऱ्याला संधी देत शिंदे यांनी सामाजिक आणि राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

Rajya Sabha Election 2026: दुसऱ्या उमेदवारावर सस्पेन्स कायम

दुसऱ्या संभाव्य उमेदवाराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. या जागेसाठी रोहित टिळक (Rohit Tilak) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अंतिम निर्णय बैठकीनंतरच घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

Rajya Sabha Election 2026: विरोधकांचीही चढाओढ

महाविकास आघाडीकडून शरद पवार रिंगणात असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे शिंदे गटाचा पुढील निर्णय निर्णायक ठरणार आहे. एकूणच, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीची ही बैठक राज्यसभेच्या समीकरणांना कलाटणी देणारी ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष शिंदे यांच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (Retiring Rajya Sabha members from Maharashtra)

शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई) 
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित? (Rajyasabha Election 2026)
राज्यसभेच्या एकूण जागा : 7

कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित? (Rajyasabha Election 2026)

राज्यसभेच्या एकूण जागा : 7

  1. विद्यमान विधानसभा सदस्य : 286 (अजित पवार आणि शिवाजी कर्डिले या दोन जागा रिक्त)
  2. कोटा : 3576 (म्हणजे 3600 मते) ( येथे एका आमदाराचे मत म्हणजे 100, म्हणून 36 आमदार हा कोटा)
  3. (फॉर्म्युला : 286 गुणिला 100/भागिला 7 जागा+1/अधिक+1)
  4. (अर्थात एकूण झालेल्या मतदानावरुन कोटा निश्चित होतो)

भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)

  1. तीन जागांसाठी लागणार : 108
  2. भाजपाकडे अतिरिक्त मते : 28

शिवसेना : 56

  1. एक जागेसाठी लागणार : 36
  2. अतिरिक्त मते : 20

राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)

  1. एक जागेसाठी लागणार : 36
  2. अतिरिक्त मते : 4

    महायुती : 52 अतिरिक्त मते

सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त...म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.

उबाठा : 20

  1. एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 16

शरद पवार : 10

  1. एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 26

काँग्रेस : 16

  1. एका जागेसाठी अतिरिक्त मते लागतील : 20

(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)

आणखी वाचा 

Rajya Sabha Election 2026: एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठांना डावलत 'या' नवख्या चेहऱ्याला संधी, भल्याभल्यांचा अंदाज चुकला

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Beed News : मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दिवंगत संतोष देशमुखांकडून पराभूत झालेली स्वरूपानंद देशमुखांची एन्ट्री, अश्विनी देशमुखही अर्ज दाखल करणार
मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दिवंगत संतोष देशमुखांकडून पराभूत झालेली स्वरूपानंद देशमुखांची एन्ट्री, अश्विनी देशमुखही अर्ज दाखल करणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttar Pradesh Accident: गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Baramati byelection 2026: बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
Vijay Thalapathi: अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
अफेअरच्या वावड्या, निवडणूकीच्या तोंडावर चित्रपट रोखला; सुपरस्टार विजयनं भर रॅलीत काढला विषय; म्हणाला..
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget