एक्स्प्लोर
PHOTO : भाविकांच्या सेवेसाठी साईबाबा संस्थान सज्ज, भक्तनिवास फुल्ल झाल्यास राहण्याची तात्पुरती व्यवस्था
शिर्डीत वाढती गर्दी लक्षात घेता भक्तनिवास फुल्ल झाले तर साई भक्तांना राहण्याची तात्पुरती व्यवस्था साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
Shirdi Temporary Arrangement of Devotee
1/10

नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळे सुद्धा गर्दी होत आहे.
2/10

अनेक जण वर्षाचा शेवटचा दिवस आणि नववर्षाचा पहिल दिवस खास बनवण्यासाठी शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी येतात.
3/10

देशभरातून येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी साईबाबा संस्थान सुद्धा सज्ज झालं आहे.
4/10

वाढती गर्दी लक्षात घेता भक्तनिवास फुल्ल झाले तर साई भक्तांना राहण्याची तात्पुरती व्यवस्था साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
5/10

भक्त निवासा शेजारी असणाऱ्या मोठ्या मांडवात एक हजार भक्त राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
6/10

यासाठी अवघ्या पाच रुपयात गादी तर पाच रुपयात चादर साई भक्तांना मिळणार आहे.
7/10

नाममात्र शुल्क घेऊन साईभक्त शिर्डीत राहू शकतात.
8/10

देशभरातून येणाऱ्या साई भक्तांना साई समाधीचे दर्शन मिळावं यासाठी 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.
9/10

श्री साईबाबा संस्थान ट्रस्टनुसार भाविक 31 डिसेंबरला रात्रभर मंदिरात थांबून साई बाबांचं दर्शन घेऊ शकतात
10/10

गर्दीमुळे भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी साईबाबा संस्थानकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे.9
Published at : 28 Dec 2022 07:49 AM (IST)
आणखी पाहा






















