एक्स्प्लोर
PHOTOS : शिर्डीच्या मंदिरात पंकजा मुंडे भक्तिभावात तल्लीन; गुरुस्थानच्या पायरीवर बसून साईनामाचा जप
Pankaja Munde : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येण्याआधी पंकजा मुंडे साईमंदिरात गुरुस्थानी भक्तीत लीन झाल्या होत्या. गुरुस्थानच्या पायरीवर बसून साईनाम जप करताना पंकजा मुंडे दिसून आल्या.
Pankaja Munde
1/8

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (दि. 04) शिर्डीत दाखल झाले.
2/8

अमित शाह यांच्या हस्ते प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्याच्या विस्तारित कामाचे उद्घाटन, लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
3/8

मात्र, या आधी अमित शाह यांनी शिर्डीत साई मंदिरात दर्शन घेतले.
4/8

अमित शाह यांच्या हस्ते साई मंदिरात पूजा व आरती करण्यात आली.
5/8

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री अमित शाह यांच्यासोबत साईदर्शनासाठी आले होते.
6/8

अमित शाह शिर्डीच्या मंदिरात येण्याआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीत लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
7/8

पंकजा मुंडे यांनी गुरुस्थानच्या पायरीवर बसून साईनामाचा जप केला.
8/8

या क्षणी पंकजा मुंडे कोणत्याही राजकीय भूमिकेपेक्षा दूर एक साईभक्त म्हणून गुरुस्थानच्या पायरीवर रममाण झालेल्या दिसून आल्या.
Published at : 05 Oct 2025 12:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























