वर्ष 2020 संपत आलंय. कोरोना महामारीमुळं अनेक महिने लॉकडाऊन होता. अशा काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सनं प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन केलं. यावर्षी अनेक वेबसीरिज आल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यातील एक एक पात्र लोकांच्या लक्षात राहिलं.
2/7
'मिर्झापूर' 2019 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाली. त्याचा दुसरा भाग 2020 मध्ये प्रदर्शित झाला. गूगलवर या सीरिजला सर्वाधिक सर्च मिळाले. यातील मुन्ना भैय्या, कालीन भैय्या, गुड्डू ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग प्रेक्षकांना एवढा भावला नाही.
3/7
स्कॅम 1992 वर्ष 2020 मध्ये रिलीज झालेली वेबसीरिज प्रेक्षकांना फारच आवडली. हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारीत ही वेबसीरिज प्रचंड गाजली. हर्षद मेहताचं पात्र साकारणाऱ्या प्रतिक गांधीचंही खूप कौतुक झालं.
4/7
2020 मध्ये पाताललोक ही वेबसीरिज देखील तुफान लोकप्रिय झाली. काही लोकांनी याला विरोध केला. मात्र ही वेबसीरिज खूप चर्चित राहिली. यात जयदीप अहलावत, आसिफ बसरा, स्वस्तिका मुखर्जी आणि अभिषेक बनर्जी या कलाकारांच्या भूमिकांचं खूप कौतुक झालं.
5/7
ब्रीद: इनटू द शॅडो ही वेबसीरिज कथा आणि अभिनयाच्या बाबतीत पसंतीस उतरली. यात अभिषेक बच्चनने शानदार अभिनय केला.
6/7
भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर आधारीत स्पेशल ऑप्स वेबसीरिज देखील खूप पाहिली गेली. यात केके मेनन आणि करण टॅकर यांनी जबरदस्त भूमिका केल्या.
7/7
आश्रम वेबसीरिज देखील खूप पाहिली गेली. बॉबी देओलच्या अभिनयाचं कौतुक या सीरिजमुळं झालं. काही लोकांनी या सीरिजला विरोधही केला.