एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला; 8 जणांचा मृत्यू
इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला झाला असूनल यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जात आहे. अनेकजण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
बगदाद : अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या रॉकेट हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
टॉप कमांडर आपल्या ताफ्यासह बगदादी विमानतळावर जात असताना अमेरिकेने रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात पॉप्युलर मोबलाइजेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे. इराक प्रशासनाने टॉप कमांडर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, सुलेमानी यांच्यावर इजराईलमध्ये रॉकेट हल्ला केल्याचा आरोप होता. अमेरिका बऱ्याच काळापासून सुलेमानी यांच्या शोधात होती.Eight killed in rocket attack on Baghdad airport in Iraq according to security sources: AFP news agency
— ANI (@ANI) January 3, 2020
हाती आलेल्या माहितीनुसार, बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 जानेवारी रोजी रॉकेट हल्ला झाला आहे. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. यामध्ये काही टॉप कमांडरचा मृत्यू झाला असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत. टॉप कमांडर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता. संबंधित बातम्या : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग संमत, सीनेटमध्ये पुढील महिन्यात मतदान पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा#UPDATE Deputy head of Iraq's Hashed al-Shaabi military force killed in airport attack: AFP news agency quotes officials https://t.co/uJX0gnyZjE
— ANI (@ANI) January 3, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
मुंबई
निवडणूक
Advertisement