Iran Israel Conflict Affect In India: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश
Iran Israel Conflict Affect In India: इराण, अमेरिका, इस्रायल युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचल्या आहेत.

Iran Israel Conflict Affect In India: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा (Iran Israel Conflict) आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या पश्चिम आशियात परिस्थिती तणावपूर्ण आहे. युद्धात इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली असून आतापर्यंत 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन, त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते आणि याचाच परिणाम आता भारतामध्ये जाणवू लागल्या आहेत. इराण, अमेरिका, इस्रायल युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचल्या आहेत.
पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद- (Iran Israel Conflict Affect In India)
युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचवू लागल्यात. इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा कालपासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती वापराचा गॅस पुरवठा लोकांना व्यवस्थित होत रहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर इथल्या प्लांटमध्ये आणि चाकणमधील एचपीसीएलच्या प्लांटमध्ये व्यावसायिक वापराचे सिलेंडर देणं बंद करण्यात आलं आहे. डीलर्सनी व्यवसायिक वापराच्या सिलेंडर्ससाठी गाड्या पाठवू नयेत अशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
तेल कंपन्यांचा डीलर्सना नेमका मेसेज काय? (commercial gas maharashtra)
प्रिय डिलर्स, युद्धजन्य परिस्थितीमुळं कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात येत आहे. सिलेंडर्स घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका. परिस्थिती सुधारली की लगेच कळवले जाईल.
व्यावसायिक वापराचा सिलेंडर कुठे वापरतात? (maharashtra commercial gas)
- हॉटेल्स, कॅफे, धाबा, केटरिंग सर्विसेस आणि रेस्टॉरंट्स
- बेकरी,मिठाईची दुकाने वगैरे
- हॉस्पिटल्स आणि ऑफिस कँटीन्स
- सेरॅमिक्स, वस्त्रोद्योग, धातू वितळवणारे, पावडर कोटिंग करणारे कारखाने
इराणवरील हल्ल्याचे कारण काय? (what reason for the war between Iran and Israel)
2025 मध्ये इराण-इस्त्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्त्रायच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार करू देणार नाहीत. परंतु, इराणने अशा कोणत्याही गोष्टींना जुमानले नाही. इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही, असे दिसताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका, HPCL, BPCL च्या डीलर्सना सूचना, VIDEO:
संबंधित बातमी:




















