एक्स्प्लोर

अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'

'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) हा महत्त्वाचा मार्ग धोक्यात आल्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा प्रवाह सुरळीत राहावा, यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

US on Russian oil to India: अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने (US Treasury Department) भारतीय रिफायनरीजना रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची परवानगी दिली आहे. ही मुदत 4 एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) हा महत्त्वाचा मार्ग धोक्यात आल्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा प्रवाह सुरळीत राहावा, यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. ही सवलत सरसकट सर्व रशियन तेलासाठी नाही. जी जहाजे 5 मार्च 2026 पूर्वी रशियातून निघाली होती आणि सध्या समुद्रात अडकली आहेत (Stranded at sea), फक्त त्याच मालाची खरेदी भारताला करता येणार आहे.

रशियाचा आर्थिक फायदा रोखण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट (Scott Bessent) यांनी स्पष्ट केले की, हा एक 'शॉर्ट टर्म' मार्ग आहे. यामुळे रशियाला मोठा आर्थिक फायदा होणार नाही, कारण हे तेल आधीच जहाजांवर चढवण्यात आलेले आहे. स्कॉट बेसेन्ट यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ऊर्जा धोरणामुळे अमेरिका आता इतिहासातील सर्वाधिक तेल आणि वायू उत्पादन करणारा देश बनला आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने (Treasury Department) भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांना रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत (Waiver) दिली आहे. हा निर्णय जाणीवपूर्वक अतिशय कमी कालावधीसाठी घेण्यात आला आहे, जेणेकरून रशियाला याचा मोठा आर्थिक फायदा होणार नाही. ही सवलत केवळ अशाच रशियन तेलासाठी आहे, जे सध्या समुद्रात जहाजांवर अडकून पडले आहे.

भारत आता अमेरिकेकडून होणारी तेल खरेदी वाढवेल

स्कॉट बेसेन्ट यांनी पुढे म्हटलं आहे की, भारत हा अमेरिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, भारत आता अमेरिकेकडून होणारी तेल खरेदी वाढवेल. इराणने जागतिक ऊर्जा पुरवठ्याला 'ओलीस' ठेवण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यातून निर्माण झालेला दबाव कमी करण्यासाठी ही एक तात्पुरती व्यवस्था आहे."

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget