एक्स्प्लोर

Egyptian Mummy : CT scan च्या मदतीने तीन हजार वर्षांपूर्वीच्या 'ममी'चं गूढ उलघडणार, इटलीतील प्रयोग

इजिप्तमधील ही ममी (Egyptian Mummy) म्हणजे प्रेत अंखेखोन्सू (Ankhekhonsu) नावाच्या एका प्राचीन धर्मगुरुचं आहे. इटलीतील मिलान शहरात या ममीवर CT scan तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून त्यातून मोठं गूढ उलघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रोम : इजिप्तचे पिरॅमिड्स आणि त्यातील ममी म्हणजे एक प्रकारचं गूढच आहे. पुनर्जन्मावर विश्वास ठेवून मेलेल्या व्यक्तीची ममी म्हणजे प्रेत कपड्यामध्ये गुंडाळून त्या पिरॅमिड्समध्ये ठेवलं जायचं. सोबत विविध अत्तरं, सुंगधी वस्तू, फळं आणि त्या व्यक्तीच्या आवडत्या गोष्टी ठेवल्या जायच्या. एक-एक ममी म्हणजे रहस्यच आहे. अशाच एका तीन हजार वर्षांपूर्वीच्या ममीचे CT scan तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रहस्य उलघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इटलीतील हा प्रयोग ऐतिहासिक संशोधानाचा एक भाग असून त्यामुळे ममी संबंधी रहस्यांचा मोठा खजाना उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इटलीमध्ये जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी अंखेखोन्सू (Ankhekhonsu) नावाच्या एका धर्मगुरुचे पिरॅमिड बांधण्यात आलं होतं. त्या पिरॅमिडमधील ममीला बाहेर काढून नंतर ते बर्गामो शहरातील सिव्हिक आर्किओलॉजिकल म्युझियममध्ये (Civic Archaeological Museum) जतन करुन ठेवण्यात आलं होतं. आता त्या ममीवर संशोधन सुरु असून मिलान शहरातील पॉलिक्लिनिको हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर तीन दिवसांपूर्वी CT scan तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर इटलीतील हजारो वर्षांपूर्वीच्या या ममी स्वत: एक बायोलॉजिकल म्युझियम म्हणजे जैविक संग्रहालय आहेत. त्यावर संशोधन करेल तितकं कमी असून काळाप्रमाणे त्यातील गूढता वाढतच जात आहे असं या ममी रिसर्च प्रोजेक्टच्या प्रमुख सबिना माल्गोरा म्हणतात.

ज्या दगडी शवपेटीत (sarcophagu) या ममीचं जतन करण्यात आलं होतं त्यावर कोरलेल्या माहितीनुसार, हे प्रेत अंखेखोन्सू (Ankhekhonsu) नावाच्या एका धर्मगुरुचं असून ते इसवी सन पूर्व 900 ते इसवी सन पूर्व 800 या काळातील आहे. 'अंखेखोन्सु देवता जिवंत आहे' असं पाचवेळा त्या शवपेटीवर कोरण्यात आलं आहे.

या ममीचे CT scan केल्याने तिच्या जीवन आणि मृत्यूसंबंधी माहिती तसंच त्याला पिरॅमिडमध्ये ठेवण्यापूर्वी कपड्यात गुंडाळून ठेवताना कोणकोणत्या गोष्टींचा वापर करण्यात आला होता याचा उलघडा होईल असं या संशोधकांना वाटतंय.

आधुनिक वैद्यकीय संशोधनासाठी प्राचीन रोग आणि जखमांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. या सीटी स्कॅनच्या माध्यमातून आपण कर्करोगाचा किंवा भूतकाळाचा धमनीशास्त्राचा अभ्यास करु शकतो आणि हे आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकते असं या ममी रिसर्च प्रोजेक्टच्या प्रमुख सबिना माल्गोरा म्हणाल्या.

(संदर्भ - Reuters)

महत्वाच्या बातम्या :

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget