Coronavirus | इटलीपेक्षा स्पेनमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित; तर अमेरिकेत जवळपास 10 हजार लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीन, इटलीनंतर अमेरिका कोरोनाचं नवं केंद्र आहे. तर इटलीपेक्षाही स्पेनमध्ये अधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत.
नवी दिल्ली : जीवघेणा कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. अनेक मोठी शहरं या व्हायरसच्या दहशतीखाली आहेत. आतापर्यंत संपूर्ण जभरात जवळपास 13 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर जवळपास जवळपास 70 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोन लाख 62 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. संसर्ग झालेल्यांची संख्या आता चीन आणि इटलीपेक्षाही स्पेन सर्वात पुढे आहे. तसेच, जगभरातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया कोणत्या देशांमध्ये या व्हायरचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
युरोपमधील स्पेन कोरोना बाधितांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर
स्पेनमध्ये एकूण 1,31646 कोरोना बाधित आहेत. तर इटलीमध्ये 128,948 कोरोनाग्रस्त आहेत. आता स्पेन युरोपमधील कोरोनाचं केंद्र बनलं आहे. एकूण आकड्यांमध्ये जगभरात अमेरिकेनंतर स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वॉशिंग्टनमध्ये असलेल्या जॉन्स हॉपकिंस युनिवर्सिटीमध्ये सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग (सीएसएसई)ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या एकूण 3,36,830 कोरोना बाधित अमेरिकेत आहेत. तर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले असून इटलीमधील मृतांचा आकडा 15,887 वर पोहोचला आहे. त्यानंतर स्पेनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 12,641 मृत्यू झाले आहेत.
पाहा व्हिडीओ : अमेरिकेत 24 तासात 1400 कोरोनाबाधितांचा मृत्यू, आतापर्यंत 8454 जणं दगावली
अमेरिकेत 9500हून अधिक मृत्यू
अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 661 लोकांचा मृत्यू झाला आहे. सीएसएसईने सांगितलेल्या आकड्यांनुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर कोरोनाचं नवं केंद्र बनलं आहे. येथे 3565 लोकांना कोरोनाचा मृत्यू झाला आहे. तर 846 आणि 479 लोकांचा मृत्यू न्यूजर्सी आणि मिशिगनमध्ये झाला आहे.
जर्मनीमध्ये एक लाखांहून अधिक कोरोना बाधित
जर्मनीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या एक लाख पार गेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात आतापर्यंत एकूण 1,584 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पहिल्या दिवसाच्या तुलनेत 147 मृत्यू आणि 5600 नवी रूग्ण आढळून आले आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे.
पाहा कोणत्या देशात काय परिस्थिती?
संबंधित बातम्या :
अमेरिकेकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मागणी, भारत पुरवणार औषध
Lock Down | फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा गोळ्या घालून ठार! 5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य Coronavirus | कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेची भारताला 7500 कोटींची मदत