एक्स्प्लोर
अमेरिकेकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मागणी, भारत पुरवणार औषध
कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत 8,452 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करावा, अशी विनंती नरेंद्र मोदींना केली आहे
नवी दिल्ली : कोरोनाचा धुमाकूळ जगभरात वाढला आहे. जगभरात 12 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून आतापर्यंत 190 देशांमध्ये पसरला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 8,452 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. अमेरिकेत तीन लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता अमेरिकेने भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी केली आहे. गेल्या महिन्यात भारताने औषधांच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधी अमेरिकेला द्यावी अशी विनंती नरेंद्र मोदींना केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी शनिवारी सकाळी पंतप्रधान मोदींशी बोलून अमेरिकेसाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन देण्याची विनंती केली. ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊस येथे आपल्या रोजच्या पत्रकार परिषदेत सांगितले की आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोललो. भारतात मोठ्या प्रमाणात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन तयार होते. भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने 25 मार्च रोजी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परंतु भारतावर अमेरिकेच्या विनंतीला मान देवून औषध पुरवण्याचे मान्य केले आहे.
Coronavirus Updates | हायड्रोक्सीक्लोरिक्विन औषधाने कोरोनाचा प्रभाव घटतो : संशोधक
अमेरिकेसह जगभरातील शास्त्रज्ञ या विषाणूची लस किंवा उपचारात्मक उपचार शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही प्रारंभिक निकालांच्या आधारे, ट्रम्प प्रशासन कोरोनाव्हायरसच्या यशस्वी उपचारांसाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन नावाच्या जुन्या मलेरिया औषधाचा वापर करण्यास अनुकूल आहे. गेल्या शनिवारी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या त्वरित तात्पुरती मंजुरीनंतर न्यूयॉर्कमधील रूग्णांच्या उपचारासाठी मलेरिया औषधासह काही अन्य औषधाच्या औषधाचा उपयोग केला जात आहे. ट्रम्प यांच्या मते हे औषध सकारात्मक परिणाम देत आहे. कोरोनाव्हायरसच्या उपचारामध्ये हे एक यशस्वी औषध आहे. अमेरिकेने यापूर्वी सुमारे 29 दशलक्ष डोस साठवले आहेत.
Coronavirus Updates | हायड्रोक्सीक्लोरिक्विन औषधाने कोरोनाचा प्रभाव घटतो : संशोधक
सूत्रांच्या माहितीनुसार हे औषध तयार करणाऱ्या सर्व कंपन्यांना भारत सरकारने औषधांचं उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना एकही गोळी स्थानिक पातळीवर खरेदी करू नका. आम्ही तुम्हाला मुबलक पुरवठा करतोय असे गुरूवारीच कळवले आहे, अशी माहिती आहे.
अमेरिकेत बळींची संख्या वाढली
अमेरिकेत शनिवारी (4 एप्रिल) कोरोनामुळे 1048 जणांनी जीव गमावला असून एकूण मृतांचा आकडा 8,452 आहे. अमेरिकेत तीन लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनपेक्षा जास्त बळी एकट्या न्यूयॉर्कमध्ये गेले आहे. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक 1 लाख 15 हजार रुग्ण आहेत. तिथे 3,565 लोकांनी जीव गमावला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 846 , मिशिगनमध्ये 540, लुईझियाना 409, वॉशिंग्टनमध्ये 314, तर कॅलिफोर्निया 131 लोकांचा बळी गेला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement