एक्स्प्लोर
Advertisement
5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य
काही देशांमध्ये 5 G या तंत्रज्ञानामुळे कोरोना पसरतो किंवा कोरोना होतो अशी अफवा पसरली आहे. मात्र खरंच 5 G मुळे कोरोना होतो? जगाला तंत्रज्ञानाचा नवा आयाम देणारी 5 जी टेक्निक खरंच धोकादायक आहे?
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वाढत चालला आहे. अनेक भाकडकथा देखील कोरोनाच्या संदर्भात आपल्याला ऐकायला मिळाल्या असतील. कोरोना व्हायरस बाबत अनेक अफवा पसरलेल्या आपण पाहिल्या असतील. मात्र एक अफवा जी पाश्चिमात्य देशांमध्ये सध्या याबाबत पसरली आहे ती आहे 5 जी संदर्भातली. काही देशांमध्ये 5 G या तंत्रज्ञानामुळे कोरोना पसरतो किंवा कोरोना होतो अशी अफवा पसरली आहे. युकेमधील काही प्रसिद्ध व्यक्तींनी देखील 5 जीमुळे कोरोना होत असल्याबाबतच्या पोस्ट केल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र खरंच 5 G मुळे कोरोना होतो? जगाला तंत्रज्ञानाचा नवा आयाम देणारी 5 जी टेक्निक खरंच धोकादायक आहे? तर याचं उत्तर आहे 'अजिबात नाही'.
हो, 5G मुळे कोरोना होत नाही. याबाबत कुठलाही वैज्ञानिक पुरावा देखील उपलब्ध झालेला नाही. ही एक अफवा असून पाश्चिमात्य देशांमधील अनेक मोठ्या टेक्निकल संस्थांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या लोकांवर आता करडी नजर असणार आहे, असं युके प्रशासनाने सांगितलं आहे.
कुठून पसरली अफवा
काही लोकांनी covid19 ची सुरुवात झालेल्या चीनमधील वुहान शहराशी 5G चं असलेलं कनेक्शन जोडून ही अफवा पसरवली. कारण 5 G चा पहिला प्रयोग या शहरात झाला होता. वुहानमध्ये 5G ची ट्रायल झाली होती. आणि याच ठिकाणाहून कोरोनाची साथ जगभरात पसरली. हा तर्क घेऊन ही अफवा पसरली, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. मात्र वुहानसोबतच 5G ची ट्रायल बीजिंगसारख्या काही शहरात देखील झाली होती. मात्र बीजिंगला कोरोनाचा कमी फटका बसला आहे.
काय आहे सत्य
5G नेटवर्कमुळे कोरोना होतो याबाबत कुठंलाही शास्त्रीय पुरावा नाही. कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिक सिग्नल अशा प्रकारच्या रोगांचा प्रसार करू शकत नाहीत. तसंच माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर 5G सारखे इलेक्ट्रॉनिक सिग्नल काही परिणाम करतात याबाबत देखील कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळं अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
भारतात सुरवातीला कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक अफवा पसरल्या. यात चिकन, मटण खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेने धुमाकूळ घातला. यामुळे चिकन, मटण व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आता 5G मुळे कोरोना होतो ही अफवा पसरल्याने अफवांचे लोकल टू ग्लोबल रूप आपल्याला पाहायला मिळाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement