World News: सुंदर ओठांसाठी केला 51 लाखांचा खर्च अन् झालं भलतंच; आता लोक म्हणू लागले 'चेटकीण'
Lip Filling Cost: जगात अशा अनेक महिला आहेत, ज्या ओठ सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्चून लिप फिलिंग करुन घेतात. पण ओठांवर करण्यात येणारी ही प्रक्रिया कधीकधी तितकीच जीवघेणी ठरते हेही तितकं खरंच.
Lip Filling: सुंदर आणि आकर्षक दिसावं असं कोणाला नाही वाटत? आजकाल प्रत्येकालाच गर्दीत उठून दिसायचं असतं, इतरांपेक्षा वेगळं आणि सुंदर दिसायचं असतं. यामुळेच आजच्या काळात कॉस्मेटिक सर्जरीला (Cosmetic Surgeries) खूप प्रोत्साहन मिळालं आहे.
काहींना त्यांचं नाक आवडत नाही, काहींना त्यांचे ओठ (Lips) आवडत नाहीत, काहींना त्यांचे सुजलेले गाल आवडत नाहीत. त्यामुळे चेहऱ्यावरील कमी, चेहऱ्यावरील दोष दूर करण्यासाठी लोक कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय निवडतात. आता या बाईकडेच बघा. ब्रिटनमध्ये (Britain) राहणारी सोफिया हिला तिचे ओठ आवडत नव्हते आणि म्हणूनच तिने लिप फिलर (Lip Filler) करवून घेण्याचा निर्णय घेतला. लिप फिलिंग (Lip Filling) करताना इंजेक्शनद्वारे ओठांचा आकार वाढवला जातो.
लिप फिलिंगसाठी केला लाखोंचा खर्च
तुम्हाला हे जाणून आणखी आश्चर्य वाटेल की, सोफियाने लिप फिलरच्या ट्रिटमेंटसाठी तब्बल 51 लाखांचा खर्च केला आहे. सोफियाला ब्रिटनमधील सर्वात मोठे ओठ असलेली महिला बनण्याचा विक्रम करायचा होता, त्यामुळे तिने लिप फिलिंग करुन घेतलं. परंतु आता लोकांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. मात्र, सोफिया ट्रोल करणाऱ्यांना फार गांभीर्यानं घेत नाही.
सोफिया म्हणते की, तिला अल्टिमेट बिम्बो डॉलसारखं दिसायचं आहे. मँचेस्टरमध्ये राहत असलेल्या या महिलेला कॉस्मेटिक सर्जरीचं इतकं वेडी लागलं आहे की, आतापर्यंत तिने यावर 51 लाखांहून अधिक खर्च केला आहे.
बनवायचा आहे वर्ल्ड रेकॉर्ड
सोफिया दर दोन महिन्यांनी लिप फिलर करून घेते आणि ते करण्यात तिला खूप मजा येत असल्याचं ती म्हणते. कोणी तिला हिणवेल, याची तिला अजिबात पर्वा नाही. सोफियाला सर्वात मोठ्या ओठांचा विश्वविक्रम (World Record) करायचा आहे आणि यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने तिच्याशी संपर्क देखील साधला आहे. लिप फिलर्स व्यतिरिक्त, सोफियाने ब्रेस्ट सर्जरी, लिपोसक्शन सर्जरी, केस ट्रान्सप्लांट आणि नाकाची सर्जरी देखील केली आहे.
दर 2 महिन्यांनी करते लिप फिलिंग
सोफियाने म्हणते की, "माझे ओठ खूप मोठे आणि भरलेले आहेत. मी दर 2 महिन्यांनी एकदा लिप फिलर करून घेते. आतापर्यंत मी माझ्या ओठांवर 50,000 पौंड म्हणजेच 51 लाख रुपये खर्च केले आहेत. मी सर्वात मोठे ओठ असलेली ब्रिटनमधील पहिली महिला असेल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही याची अधिकृत नोंद घेण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला आहे.
हेही वाचा:
Travel Tips: विमानातील 'या' 5 गोष्टींना स्पर्श करणं टाळा; अन्यथा होऊ शकतो लाखो बॅक्टेरियांशी संपर्क