Trending: 9 महिने उलटले तरी महिलेला गरोदर असल्याचं कळलं नाही; मग एके दिवशी अचानक कळ आली आणि...
पहिलं महिलेला वाटलं, युरिन इन्फेक्शनमुळे वेदना होत असतील. पण पोटात कळा येणं वाढल्यानंतर अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली.
Weird News: गर्भधारणेवेळी (Pregnancy) अनेक लक्षणं दिसतात. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती (Pregnant) होते, तेव्हा तिच्या शरीरात विविध प्रकारची लक्षणं (Pregnancy Symptoms) दिसू लागतात. मासिक पाळी चुकणं हे गरोदरपणाचं पहिलं लक्षण मानलं जातं. यानंतर चक्कर येणं किंवा उलट्या होणं यासारखी लक्षणं दिसून येतात. पण ब्रिटनमधून गर्भधारणेचं एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ब्रिटनमधील (Britain) एका महिलेला तिच्या गरोदरपणाबाबत तेव्हा कळलं, जेव्हा बाळाचे पाय बाहेर येत असल्याचं दिसू लागलं.
नेमकं घडलं काय?
हा प्रकार ज्या महिलेसोबत घडला तू मूळची ब्रिटनची आहे, फेय व्हाईट (Faye White) असं या महिलेचं नाव असून ती केवळ 19 वर्षांची आहे. मिररला फेयने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला तिला वाटलं की कदाचित युरिन इन्फेक्शनमुळे तिला वेदना होत आहेत. मात्र, अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या आणि रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये जात असताना रस्त्यातच कळा वाढल्या आणि शरीरातून भरपूर पाणी जाऊ लागलं. तेव्हा फेयच्या सासूने बाळाचे पाय बाहेर येत असल्याचं पाहिलं आणि हे पाहून तिला चांगलाच धक्का बसला. त्यानंतर फेयला कळलं की, तिला युरिन इन्फेक्शनचा त्रास नसून त्या प्रसूती वेदना होत्या. अचानक सुरू झालेल्या प्रसूती वेदनांमुळे फेयची प्रसूती अॅम्ब्युलन्समध्येच करण्यात आली, त्यासाठी 2 तास लागले आणि रुग्णवाहिकेतच तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला.
सहा वेळा प्रेग्नेंसी टेस्ट केली, तरीही कळलं नाही
फेयला 9 महिन्यांत गर्भधारणेबद्दल अजिबात कळलं नसल्याचं तिने सांगितलं, कारण तिच्या शरीरात त्याची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. तिला अगदी मासिक पाळी देखील नियमितपणे येत होती. फेयला कधीही वेदना देखील झाल्या नाहीत किंवा गर्भधारणेचा संशय निर्माण करणारी कोणतीही गोष्ट तिच्यासोबत घडली नाही.
तरीही 9 महिन्यांच्या गर्भधारणेदरम्यान तिने 6 वेळा गर्भधारणा चाचणी केली होती, परंतु सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या. इतकंच नाही तर ती तिचं आयुष्य खूप एन्जॉय करत होती, ती दारू पित होती, धुम्रपान करत होती, पार्ट्या करत होती, उड्या मारत होती. एकंदरीत, तिने त्या सर्व गोष्टी केल्या, ज्या महिलांना गर्भधारणेदरम्यान करण्यास सक्त मनाई असते.
त्यांना नको होतं दुसरं मूल
फेयच्या शरीराला अधेमधे सूज येते, तिला सूज येण्याची समस्या आहे. त्यामुळे ही सामान्य गोष्ट असल्याचं समजून तिने गर्भधारणेदरम्यान आलेल्या पोटाकडेही दुर्लक्ष केलं. फेयला दोन वर्षांचा मुलगाही आहे, त्यामुळे ती सध्या दुसऱ्या मुलाला जन्माला घालण्याचा विचार करत नव्हती. मुलीचा जन्म झाल्याच्या दोन आठवड्यांपूर्वीच तिने तिच्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली होती की, तिला दुसरं मूल नको.
पण, कदाचित नशिबात काही वेगळं होतं. याआधीच्या गरोदरपणात फेयने स्वत:ची नीट काळजी घेतल्याचंही म्हटलं. गरोदरपणात ती दारू आणि धूम्रपानापासून दूर राहते, परंतु तिच्या मुलीच्या गर्भधारणेदरम्यान ती खूप निष्काळजीपणाने वागली, कारण तिला ती गरोदर असल्याचं माहीत नव्हतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
महिलेनं दत्तक घेतली 13 मुलं; दिसायला एकदम खरी, पण त्यामागील सत्य काही वेगळंच...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )