(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठी पाट्यांवरून मनसे ठाण्यात ॲक्शन मोडमध्ये, दुकानदारांना मनसैनिकांनी दिला दोन ते तीन दिवसांचा अल्टिमेटम
ठाण्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी पाट्या नसतील तर शहानिशा करून नोटीस बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत
ठाणे : मराठी पाट्या (Marathi Board) लावण्यावरून मनसे (MNS) पुन्हा आक्रमक झालीय. ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्यासाठी तीन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आलाय. त्याचवेळी ठाणे मनपा (Thane News) आयुक्तही अॅक्शन मोडवर असल्याचं पहायला मिळतंय. आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी पाट्या नसतील तर शहानिशा करून नोटीस बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत
मराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आहे. मनसे पदाधिकारी स्वप्नील मेहेंद्रकर यांच्यासह मनसैनिक दुकानात शिरून व्यापाऱ्यांनशी चर्चा करत आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या वतीने 9 प्रभाग समिती मध्ये असणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील दुकाने विविध आस्थापना मराठी पाट्या नसेल तर त्यावरती शहानिशा करून नोटीस बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाणे मनपा आयुक्तही अॅक्शन मोडवर
आस्थापनेचे नाम फलक देवनागरी मराठी भाषेतील जरी असेल तरी त्यावरती अक्षर लेखन हे नाम फलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणे देखील आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक (फॉन्ट )इतर कोणत्या भाषेतील अक्षरांचा टंक आकारापेक्षा लहान असणार नाही याची संबंधित सहाय्यक आयुक्तांनी कारवाई करताना खबरदारी घ्यावयाची असेही पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.
आस्थापनांना समज
ठाण्यातही मनसेचे स्वप्निल महेंद्रकर यांनी एका इंग्रजी पाटी असणाऱ्या दुकानाला काळे फासले होते. याच पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील वसंत विहार येथील दुकानांवर इंग्रजी पाट्या असणाऱ्या आस्थापनांना समज दिला आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात इंग्रजी पाठ्य मराठी केल्या नाहीत तर पुन्हा एकदा मनसे स्टाईलने त्यांना उत्तर देणार असे यावेळी मनसेचे स्वप्निल महेंद्रकर यांनी सांगितले आहे.
मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशारा
मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यासंदर्भात मनसेचे आंदोलन केले आहे. ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरुमला काळे फसले आहे. मुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. नसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यावरून आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. दुकानाचे नामफलक मराठीत (Marathi Board) झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे.