डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; एकावर उपचार सुरु
डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
![डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; एकावर उपचार सुरु Dombivli News Building collapses in Dombivli two dead डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; एकावर उपचार सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/16/acaf9b39829d6fff78a7662c998f38311694825860166339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dombivli Building collapses : डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, एकावर उपचार सुरु आहेत. अरविंद भाटकर आणि सुनील लोढा अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळं कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
डोंबिवलीतील आयरे रोड परिसरातील आदिनारायण ही इमारत काल सायंकाळच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तीन जण अडकले होते. यामधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अरविंद भाटकर आणि सुनील लोढा अशी मृतांची नावे असून मृत सुनील लोढा यांची पत्नी दीप्ती या बचावल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)