एक्स्प्लोर

अजितदादांच्या निधनाबद्दल रोहित पवार राजकारण करतायेत, हे अत्यंत चुकीचं आणि घृणास्पद, आनंद परांजपेंचा हल्लाबोल

अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत. ते अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.

Anand Paranjape on Rohit Pawar :   अजित पवार यांच्या दु:खद व दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत. ते अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व पार्थ पवार यांच्यासमवेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेऊन अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणावे अशी मागणी केली होती. शिवाय त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही केली होती. मात्र, दुर्दैवाने आमदार रोहित पवार गेले काही दिवस राजकारण करत आहेत त्याबद्दल आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त केली. 

वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर अजितदादा पवार यांना कुटुंबाने एकटं पाडलं

शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रोहित पवार यांनी भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करुन गुन्हा नोंदवला जाईल असे आश्वस्त करुन देखील आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची रोहित पवार यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त करुन देखील गुन्हा दाखल करण्याचे राजकारण रोहित पवार यांनी थांबवावे. गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नेते... चार नेते अशा प्रकारचा आरोप रोहित पवार करत आहेत. खरंतर 2 जुलै 2023 मध्ये वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमचे दैवत अजितदादा पवार यांना कुटुंबाने एकटं कसं पाडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. किंबहुना लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवार श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार या बाहेरच्या पवार आहेत आणि घरातील पवारांना मतदान करा असे वक्तव्य वरिष्ठांकडून करण्यात आले होते. याची आठवण करुन देताना आनंद परांजपे यांनी विधानसभा निवडणुकीत अत्यंत हताश होऊन कुटुंबाने मला एकटं पाडलं पण बारामतीची जनता मला एकटं पाडणार नाही. ही उद्विग्नता दादांनी व्यक्त केल्याचा व्हिडिओ आजही सगळ्यांकडे पहायला मिळत असल्याचे सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी  सुनेत्रा पवार यांच्या पाठिशी उभी

आज अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर राजकारण केले जातेय. ते चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, पार्थ, जय पवार यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. राष्ट्रीय अधिवेशनात जय पवार यांना मागील खुर्चीत बसवण्यात आले अशा प्रकारचा चुकीचा व्हिडीओ माध्यमांमध्ये दाखवण्यात आला. शिवाय तसा आरोप रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. मुळात अधिवेशनाचे फेसबुक लाईव्ह सुरू होते त्यावेळी सुत्रसंचालक सुरज चव्हाण हे जय पवार यांना पुढे बसण्यासाठी आग्रह करत होते. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नेत्यांवर जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत असेही आनंद परांजपे म्हणाले. 

अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातावरुन जे राजकारण केले जात आहे ते चुकीचे

महाराष्ट्रासमोर सत्य आले पाहिजे पण अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातावरुन जे राजकारण केले जात आहे ते चूकीचे आहे. आम्ही सर्वजण म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नेते नाही तर महाराष्ट्राने अजितदादांसारखं नेतृत्व मुकलंय ती महाराष्ट्रातील जनता सत्य बाहेर येण्याची आतुरतेने वाट पहात आहे असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
Embed widget