तुम्हाला कोणी त्रास देणार नाही, छठ पूजेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंकडून उत्तर भारतीयांना अश्वासन
Eknath shinde : सर्व सण, परंपरा आम्ही ठरवलं आणि मोठं जोरदार झाले आहेत. तसंच छठपूजा देखील जोरदार झाली आहे.
Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील रायलादेवी तलाव आणि उपवन तलावाजवळील छठ पूजा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळ शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक आणि नरेश म्हस्के उपस्थिती होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर भारतीय नागरिकांना संबोधित केलं. सर्व सण, परंपरा आम्ही ठरवलं आणि मोठं जोरदार झाले आहेत. तसंच छठपूजा देखील जोरदार झाली आहे. तुम्हाला कोणी त्रास देणार नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी उत्तर भारतीयांना दिला.
छठ पूजेसाठी मोठी गर्दी झाली आहे. पूजेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं जमली आहेत. छठ पूजा सण संपूर्ण देशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दरवर्षी मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. वागळे इस्टेट एकनाथ शिंदेचा गड आहे, आणि ह्या लोकांनीच मला सुरुवातीला नगरसेवक बनवलंय, आणि नंतर आमदार आणि आता आपल्याच आशीर्वादानं मी मुख्यमंत्री बनलो आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आपण सारे जाणताच, मुंबईत देखील आज छठपूजा होत आहे. मी कृत्रिम तलावांची निर्मितीसाठी सांगितलंय आणि ठाण्यात देखील कृत्रिम तलाव निर्माण झाले आहेत. श्रद्धा आणि भक्तीचा हा विषय आहे. चार महिन्यापूर्वीच मी मोठा कार्यक्रम केलाय, सर्व जगाने त्याची दखल घेतली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईसह देशभरात छठ पूजा उत्साहात साजरी केली जात आहे. सणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. सर्व वर्गाच्या जीवनात बदल आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. शेतकरी, महिला, कामगार सर्व वर्गासाठी आम्हा काम करत आहे. फक्त तीन महिन्यात 72 मोठे निर्णय घेतले आहेत. पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी कमी केले. कोणी प्रयत्न पण केले नाहीत असे निर्णय घेण्याचा, आम्ही निर्णय घेतला, असे एकनाथ शइंदे यांनी सांगितलं.
हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार आहे, दिघेंच्या विचाराचे सरकार आहे. पंतप्रधान मोदींचे देखील आम्हाला समर्थन दिलं आहे. ३७० रद्द करण्याचं काम देखील त्यांनी केलं आहे. अयोद्धाचं काम देखील सुरु झालं आहे. लवकरच आम्ही अयोध्येला जाणार आहोत, असेही एकनात शिंदे यांनी सांगितलं.
सर्वांना चिंता आहे की हा माणूस एवढं काम कसं करतोय. लोकं स्वागत करतात, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. त्यातूनच काम करण्याचं बळ मिळतं. आमच्या निर्णायाचं राज्याबाहेर देखील स्वागत केलं जातंय. लोकांच्या मन की बात आम्ही केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला 397 तर आम्हाला 227 सीट मिळाली आहेत. सर्वांना चिंता पडली आहे, चार महिन्यात एवढे तर अडीच वर्षात किती? जे कामावर नव्हते त्यांना देखील कामावर लावलंय. मी काम करतच राहणार कारण महाराष्ट्राला न्याय द्यायचाय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.