एक्स्प्लोर
पुन्हा सुपरओव्हर, चौथ्या टी 20 सामन्यातही रोमांच, मुंबईकर शार्दुलने सामना केला टाय
अखेरच्या षटकात सात धावा विजयासाठी हव्या असताना न्यूझीलंडला केवळ सहा धावाच करता आल्या. यामुळे सलग दुसरा सामना टाय झाला आहे. आता पुन्हा सुपरओव्हरने सामन्याचा निकाल लागणार आहे.
वेलिंग्टन : तिसऱ्या टी 20 सामन्यात अटीतटीच्या लढतीनंतर चौथा सामना देखील टाय झाला. तिसऱ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियानं थरारक विजय मिळवला. अशीच स्थिती काहीशी आजच्या चौथ्या सामन्यात देखील झाली आहे. मात्र यावेळी मोहम्मद शमीची जागा घेतली ती मुंबईकर शार्दूल ठाकूरने. अखेरच्या षटकात सात धावा विजयासाठी हव्या असताना न्यूझीलंडला केवळ सहा धावाच करता आल्या. यामुळे सलग दुसरा सामना टाय झाला आहे. आता पुन्हा सुपरओव्हरने सामन्याचा निकाल लागणार आहे.
वेलिंग्टनच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडनं टीम इंडियाला आठ बाद 165 धावांत रोखलं होतं. या सामन्यात भारतानं रोहित शर्माला दिलेली विश्रांती न्यूझीलंडच्या पथ्यावर पडली. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची 6 बाद 88 अशी घसरगुंडी उडाली होती. पण मनीष पांडेनं झळकावलेल्या नाबाद अर्धशतकानं भारतीय डावाला आकार दिला. त्यानं 36 चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद 50 धावांची खेळी उभारली. सलामीच्या लोकेश राहुलनं 39 आणि शार्दूल ठाकूरनं 20 धावांची खेळी केली.
विजयासाठी 166 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत पुन्हा पलटी खाल्ली. नवदीप सैनीने 19 वं तर शार्दुल ठाकूरने 20 वं षटक भेदक मारा करत पुन्हा एकदा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. अर्धशतकवीर टीम सेफर्ट, रॉस टेलर यांना अखेरच्या षटकात माघारी धाडण्यामध्ये भारतीय गोलंदाजांना यश आलं. न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरोने 64 तर टीम सेफर्टने 57 धावा केल्या.
गेल्या सामन्यात देखील टीम इंडियाने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या हॅमिल्टनच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर सनसनाटी मात केली होती. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मर्यादित 20 षटकांत न्यूझीलंडच्या फलंदाजांना 179 धावा करता आल्या. त्यामुळे टाय झालेल्या सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने दिलेलं 18 धावांचं आव्हान रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने पूर्ण करुन भारताला मालिकाही जिंकून दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement