एक्स्प्लोर
महाबीजच्या दरवाढीला स्थगिती, खरेदी केलेल्या बियाण्यांचं काय?
मुंबई : राज्यात महाबीजने बियाणांच्या किमतीत केलेल्या वाढीला राज्य सरकारने स्थिगिती दिली आहे. आता शेतकऱ्यांना जुन्या दरातचं बियाणं उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारने दरवाढ स्थगित केली असली तरी आतापर्यंत महाबीजचे जवळपास 70 ते 80 टक्के बियाण्यांची विक्री झाली आहे, त्यामुळे खरेदी केलेल्या बियाण्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एबीपी माझाच्या वेबसाईटने महाबीजच्या दरवाढीची बातमी सर्वात आधी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बातमीची दखल घेत, तत्काळ दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी महाबीजच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत दरवाढीला स्थगिती देण्याचे आदेश दिले.
महाबीजने कडधान्य आणि इतर वाणांच्या किमतींमध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. शेतकऱ्यांसाठी स्वस्त आणि रास्त दरात बियाणे उपलब्ध करून देण्याचं हक्काचं ठिकाण म्हणून राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीजची ओळख आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या या महामंडळाने यावर्षी ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना चिंतेत टाकलं होतं. महाबीजने डाळवर्गीय बियाण्यांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी दरवाढ केली होती. मात्र, अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नाराजीचा विचार करत दरवाढीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बाजारात सर्वच खाजगी बियाणे विक्रेत्यांनी बियाण्यांत दरवाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी महाबीजकडे आशेनं पाहतात. त्यात दुष्काळामुळे आधीच शेतकरी पुरता हैराण झाला आहे. अशा वेळेत दरवाढ परवडणारी नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement