एक्स्प्लोर

Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार

Sangola Vidhansabha : राज्यात यंदा महायुती व महाविकास आघाडी उदयास आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळीच रंगत असून जोरदार चुरसही पाहायला मिळणार आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि दुष्काळ भाग म्हणून कायम चर्चित राहिलेल्या सांगोला (Sangola) मतदारसंघातही यंदा तिरंगी लढतीची शक्यता आहे. काय झाडी, काय डोंगार आणि काय हाटील म्हणत राज्यभर प्रसिद्धी मिळवेल्या सेलिब्रिटी आमदार शहाजी बापू पाटील यांचा हा मतदारसंघ. मात्र, तत्पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि दिवंगत गणपत आबा देशमुख यांचा हा मतदारसंघ म्हणून राज्याला ओळख आहे. शेतकरी व कामगारांसाठी लढणारा नेता म्हणून तब्बल 11 टर्म या मतदारसंघातून गणपत देशमुख यांनी प्रतिनिधित्व केलं. मात्र, गत निवडणुकीत प्रकृतीचं कारण देत त्यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली होती. त्यावेळीही, कार्यकर्त्यांनी अक्षरश: त्यांच्या पायावर डोकं टेकवत त्यांनाच उमेदवारी लढविण्यासाठी आग्रह केला होता. मात्र, गत निवडणुकी त्यांनी नातू अनिकेत देशमुख यांना विधानसभेच्या (Vidhansabha) मैदानात उतरवले होते. यंदा महाविकास आघाडीत ही जागा शेकापला न मिळाल्यास आम्ही लाल बावटा फडकवणार असल्याचा इशाराच अनिकेत देशमुख यांनी दिला होता. कारण, गत विधानसभा निवडणुकीत केवळ 768 मताच्या फरकाने आपला पराभव देशमुख यांचा पराभव झाला होता. 

राज्यात यंदा महायुती व महाविकास आघाडी उदयास आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळीच रंगत असून जोरदार चुरसही पाहायला मिळणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शहाजी बापू पाटील यांचं नाव चर्चेत असून शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे, शहाजी बापू पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अनिकेत देशमुख मैदानात उतरणार की दीपक साळुंखे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार याची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली होती. त्यातच, महाविकास आघाडीकडून जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाने बार्शी सोबत सांगोल्याची जागाही मागितली आहे. गेल्यावेळी शिवसेनेचा आमदार असल्याने या जागेवर आमचा हक्क असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यामुळं महाविकास आघाडीला कायम साथ देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची जागा धोक्यात आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते.

गत 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय झालं

सांगोला मतदारसंघ हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचा राहिला आहे. येथील मतदारसंघात माजी आमदार आणि दिवंगत शेकाप नेते गणपत देशमुख यांनी तब्बल 11 वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम केला आहे. मात्र, गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघातून शिवसेना युतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना विजय मिळाला होता. शहाजी पाटील यांना 99,464 मतं मिळाली असून केवळ 768 मताधिक्यांनी ते आमदार बनले. पाटील यांनी शेकापच्या डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता. अनिकेत देशमुख हे गणपत देशमुख यांचे नातू असून त्यांचा 2019 ला निसटता पराभव झाला होता. त्यामुळे, यंदाही विधानसभेच्या रणांगणात देशमुख कुटुंबीयांनी आपली ताकद लावली आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे यांनीही जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं. 

लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य

धैर्यशील मोहिते पाटील यांना जिल्ह्यातील सांगोला वळगता माढा,पंढरपूर,करमाळा आणि माळशिरस या 4 मतदारसंघातून लीड आहे. त्यामुळेच, धैर्यशील मोहिते पाटील 1,20,837 मतांनी विजयी झाले आहेत. सांगोल मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळालं. सांगोल्यातून जवळपास 4,500 मतांचा लीड निंबाळकर यांना मिळाला आहे. निंबाळकर यांना केवळ सांगोला मतदारसंघातूनच मताधिक्य मिळालं असून येथील मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. काय झाडी, डोंगर, हाटील फेम शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, लोकसभेला त्यांची जादू मतदारसंघात चालली होती, ती आता विधानसभेला चालणार का हेही लवकरच स्पष्ट होईल.  

3 लाख 29 हजार  मतदार

सांगोला विधानसभा मदारसंघात एकूण 3 लाख 29 हजार 48 मतदारसंख्या आहेत. त्यापैकी, 1 लाख 70 हजार 690 पुरुष मतदार असून 1 लाख 58 हजार 353 स्त्री मतदार आहेत. मतदारसंघातील तृतीयपंथी मतदारांची संख्या 5 एवढी आहे. तसेच, मतदारसंघात एकूण 305 मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया पार पडत आहे. 

हेही वाचा

शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
Embed widget