Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Solaur vidhansabha :उत्तम जानकर यांनी लोकसभा निवडणूक काळात अजित पवार गटात असतानाही पक्ष न सोडता अजित पवारांवर थेट बारामतीमध्ये जाऊन सर्वात टोकाची टीका केली होती.
Solaur vidhansabha : सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना यंदा पाहायला मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा आणि माजी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ राहिलेल्या माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत होत आहे. गत 2019 च्या निवडणुकीत येथून भाजपचे राम सातपुते विजयी झाले होते, त्यांना राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी टफ फाईट दिली होती. यंदाही येथील मतदारसंघात अशीच लढत फिक्स आहे. मात्र, यंदा राजकीय स्थित्यंतर व गणितं बदलली आहे. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा (vidhansabha) निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अखेर, आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालात माळशिरस मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर हे विजयी झाले आहेत.
उत्तम जानकर यांना 18 व्या फेरीअखेर 111007 मतं मिळाली असून 9085 मतांचं मताधिक्य आहे. येथून भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना 101922 मतं मिळाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, येथील मतदारसंघात उत्तम जानकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.उत्तम जानकर यांनी लोकसभा निवडणूक काळात अजित पवार गटात असतानाही पक्ष न सोडता अजित पवारांवर थेट बारामतीमध्ये जाऊन सर्वात टोकाची टीका केली होती. जानकर हे धनगर समाजाचे असले तरी त्यांनी खाटीक धनगर प्रमाणपत्र मिळावत अनुसूचित जातींमधून गेल्यावेळी विधानसभा लढली होती. त्यामुळे, यंदाही महाविकास आघाडीकडून त्यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. कारण, लोकसभा निवडणुकीला त्यांनी महायुतीच्या नेत्यांना थेट अंगावर घेतलं होतं, तसेच महायुतीची ऑफर नाकारत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काम केलंय. तर, गेल्या 25 वर्षांपासूनचा मोहिते पाटील यांच्यासोबतचा वादही संपुष्टात आणण्यात आला होता. त्यामुळे, यंदा उत्तम जानकर यांना मैदानात उतरवण्यात येत आहे.
माळशिरस मतदारसंघात पूर्वीपासूनच मोहित पाटील यांचा हातखंडा राहिला आहे. तसेच, शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून मोहिते पाटील घराणे राज्यात प्रसिद्ध होते. मात्र, गत 2019 च्या निवडणुकांपूर्वी रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे शरद पवारांसोबत त्यांची फारकत झाली. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांनीही रणजीतसिंह मोहिते पाटलांसाठी विधानसभेला भाजप उमेदवारासाठी काम केलं. त्यामुळे, युतीमध्ये माळशिरसची जागा भाजपला सोडण्यात आली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने येथून राष्ट्रवादीने मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक राहिलेल्या उत्तम जानकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, यंदा राज्यातील राजकीय समिकरणे बदलली असून महायुती व महाविकास आघाडी उदयास आली आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून विद्यमान आमदार असल्याने ही जागा भाजपलाचा सुटणार आहे. तर, महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाच येथून तिकीट मिळणार आहे, ते उत्तम जानकर यांनाच दिलं जाईल, असे स्पष्ट आहे.
लोकसभेला माळशिरसमधून महाविकास आघाडीला लीड
लोकसभा निवडणुकांमध्ये यंदा मोहिते पाटलांनी भाजपला धक्का देत ऐनवेळी तुतारी हाती घेतली होती. त्यामुळे, धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली. त्यामुळे, माळशिरस हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असल्याने येथील मतदारसंघातून त्यांना मताधिक्य मिळणार हे निश्चित मानलं जात होतं. त्यातच, भाजप महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा जनसंपर्क येथील मतदारसंघात कमी असल्याने, व भाजप आमदार राम सातपुते यांच्यापेक्षा मोहित पाटलांचं वर्चस्व मतदारसंघात असल्याने धैर्यशील मोहिते पाटलांनी येथून आघाडी घेतली. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून तब्बल 70,134 मतांचा लीड धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाला होता. त्यामुळे, यावेळी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं पारडं जड मानलं जात आहे. त्यातच, राम सातपुते यांचा मतदारसंघात व्यक्तिगत मोठा जनसंपर्क नाही. तसेच, गेल्या 5 वर्षातील अँटीइन्कबन्सीचा देखील त्यांना फटका बसू शकतो. मात्र, विकासकामे व भाजप नेत्यांच्या पाठिंब्यावर ते निवडणुकीत लढा देतील.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं?
आमदार राम सातपुते यांनी गतवर्षी 2019 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात पाऊल ठेवले होते. भाजपच्या युवा मोर्चामध्ये कार्यकर्ता बनून काम केल्याने राम सातपुते यांना भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले. मूळचे बीड जिल्ह्यातील असूनही आई-वडिलांसोबत उदरनिर्वाहासाठी माळशिरस तालुक्यातील भांबुर्डे गावात स्थायिक झाल्याने भाजपने त्यांना माळशिरस मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरवले होते. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्यानेच त्यांना माळशिरस मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. येथील मतदारसंघात पूर्वीपासूनच मोहित पाटील यांचे वर्चस्व आणि दबदबा राहिला आहे. मात्र, हा मतदारसंघ राखीव असल्याने विधानसभेला राम सातपुते यांना भाजपने तिकीट दिले. तर, राम सातपुते यांच्या पाठीशी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण ताकद लागली होती. त्यामुळे, राम सातपुतेंना विजय मिळाला. मात्र, त्यांचा विजय मोठ्या फरकाने किंवा मताधिक्याने नव्हता. केवळ 2702 मतांनी त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. माळशिरस मतदारसंघात उत्तम जानकर यांनी टफ फाईट दिली होती. पहिल्या फेरीपासूनच सातपुते व जानकर यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. मात्र, 22 व्या फेरीत राम सातपुते यांनी 856 मतांची आघाडी घेत विजयाकडे शेवटचे पाऊल टाकले.