एक्स्प्लोर

आमदार योगेश कदम कार अपघात प्रकरणी मोठं अपडेट! फरार वाहनचालकाला यूपीतून अटक; म्हणाला...

आमदार योगेश कदम (Yogesh Kadam Accident) यांच्या गाडीला पाठीमागून धडक देऊन फरार झालेल्या वाहनचालकाला पोलिसांनी अटक केलं आहे.  

MLA Yogesh Kadam Accident Updates: आमदार योगेश कदम कार अपघात प्रकरणी एक मोठं अपडेट समोर आलं आहे.  आमदार योगेश कदम (Yogesh Kadam Accident) यांच्या गाडीला पाठीमागून धडक देऊन फरार झालेल्या वाहनचालकाला पोलिसांनी अटक केलं आहे.  आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला  पकडले. आरोपी उत्तरप्रदेश येथील जनाडी बलिया गावातील आहे. अकलेश नरसिंग यादव असं आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला जामीनावर सोडण्यात आले आहे. गाडीचे ब्रेक लायनर जाम झाल्याने ब्रेक न लागल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला, अशी त्यानं जबाबात कबुली दिली आहे. 

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला सहा जानेवारी रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला होता. या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम कुठलीही दुखापत झाली नव्हती. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली होती.  आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली होती. यानंतर टँकर पलटी झाला होता आणि चालक पळून गेला होता.  आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली होती. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले होते.   

योगेश कदम हे खेड दापोली-खेड-मंडणगड  मतदारसंघातून आमदार आहेत. ते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र आहेत. शिवसेनेत फुट पडून शिंदे गटाची निर्मिती झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत शिंदे गट जवळ केला. 

या अपघातानंतर योगेश कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना घातपाताची शक्यता व्यक्त केली होती.  'या अपघाताचा पॅटर्न जरा वेगळा आहे. त्यामुळे यात घातपाताची शक्यता आहे. या अपघाताबाबत तपास करण्यासाठी मी पोलिसांना सांगितलं आहे. तसेच, या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेही केली आहे', असं योगेश कदम म्हणाले होते. आम्हाला जी शंका आली आहे, त्यादृष्टीनं तपास करुन सत्य जर पुढे आलं, तर चांगलंच आहे. भविष्यात त्या दृष्टीनं काळजी घेता येईल. चौकशी करून या अपघाताचा जो काही अहवाल आहे, तो समोर येईल. आम्हाला शंका आली म्हणून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करतोय, असंही योगेश कदम म्हणाले होते.  

राज्यात गेल्या काही दिवसात नेत्यांच्या रस्ते अपघाताच्या घटना वाढल्या

राज्यात गेल्या काही दिवसात नेत्यांच्या रस्ते अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. आमदार विनायक मेटे (vinayak mete) यांचा पुणे-मुंबई हायवेवर अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा देखील भीषण अपघात झाला होता. तर गेल्या आठवड्यात आमदार धनंजय मुंडे (dhanjay Mundde)  यांच्या गाडीला देखील अपघात झाल्यानं त्यांना मार लागला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

MLA Yogesh Kadam Accident : कशेडी घाटात टँकरची धडक, गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर; नेमका कसा झाला योगेश कदम यांचा अपघात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget